आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्‍यायाधीशांच्‍या निर्णयानंतर हा खुनी असा भडकला, त्‍याने सुरू केली थेट शिवीगाळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाल/खंडवा - एटीएसचा जवान सीताराम यादव यांच्या हत्‍या प्रकरणातील आरोपी कुख्यात दहशतवादी अबू फैजल याने सुनावणीनंतर असा काही गोंधळ घातला, पाहताक्षणी कित्‍येकांच्‍या भुवया उंचावतील. न्यायाधीशांनी त्‍याला दोषी ठरवत 302 अंतर्गत शिक्षा सुनावली हा निर्णय ऐकल्‍यानंतर तो असा भडकला की, त्‍याने थेट शिवीगाळ करायला सुरूवात केली. तो एवढा भडकला की, जवान त्‍याला सावरूही शकले नाहीत. नंतर जोरजोरात ओरडण्‍यास त्‍याने सुरूवात केली.
असा घडला प्रकार
न्‍यायाधीशांना त्‍यांच्‍या समोरील टीव्‍हीवर व्हिडिओ कॉन्फरन्सिंग रूममधील हे दृष्‍य पाहता आले. पाच जवानांच्‍या सुरक्षेत अबू फैजल VC रूममध्‍ये पोहोचला. त्‍याच्‍या चेह-यावर चांगलाच राग दिसत होता. जसे की, निर्णय काय होईल हे त्‍याला ठाऊकच होते. तेवढ्यात न्‍यायाधीश शांत आवाजात म्‍हणाले, तुला सीतारामच्‍या हत्‍येप्रकरणी दोषी ठरवत 302 अंतर्गत शनिवारी शिक्षा सुनावण्‍यात येणार आहे, हा निर्णय ऐकताच तो भडकला.
खंडवाच्‍या तुरुंगातून फरार झाले होते दहशतवादी
1 ऑक्‍टोबर 2013 रोजी खंडवा जेलमधून काही सीमी दहशतवादी फरार झाले होते. त्‍यापैकी एक आबिद मिर्झा याला काही तासातच पकडण्‍यात आले, तर अबू फैजल दो महिन्‍यांनंतर पोलिसांच्‍या हाती लागला. हे दहशतवादी 28 नोव्‍हेंबर 2009 मध्‍ये सीताराम यादव यांच्‍यासह तीन जणांच्‍या हत्‍येच्‍या आरोपात पकडण्‍यात आले होते.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, संबंधित फोटो..