आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Muslims Annoyed, Maulavis Saying Not To Watch Salman Films

मुस्लिम धर्मगुरुंचा सलमानच्या \'KICK\'ला विरोध? सिनेमा न पाहण्याचे केले अपील

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये काजी सैय्यद मुश्‍ताक नदवी यांनी बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा सिनेमा 'किक'ला विरोध दर्शवला आहे. मुस्लिम धर्मियांनी ईदच्या दिवशी 'किक' सिनेमा पाहू नये, असे आवाहन सैय्यद मुश्ताक नदवी यांनी केले आहे.

मंगळवारी (29 जुलै) संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी करण्‍यात आली. सलमान खान 'किक' हा सिनेमा गेल्या शुक्रवारी रिलिज झाला. 'किक' हा सिनेमा न पाहाण्याचे आवाहन नदवी यांनी ईदचा नमाज अदा केल्यानंतर केले होते. नदवी म्हणाले, 'प्रत्येक वर्षी सिनेमे रिलिज होतात. आपण ते मोठ्या आनंदाने पाहातो. परंतु यंदा सिनेमा पाहू नका. आज ईद आहे. आपल्या घरी थांबून पाहुण्यांचे स्वागत करा.'

भोपाळमधील अनेक मशिदींमधील मौलवींनी अशाच प्रकारचे अपील केल्याची माहिती मिळाली आहे. मौलवीच्या मते ईद रमजानच्या दिवशी रोजे केल्याचे फळ मिळत असते. संपूर्ण रमजान महिन्यात लोक रोजे करतात. परंतु त्याचे फळ ज्या दिवशी मिळते त्या दिवशी लोक सिनेमागृहात राहतात. त्यामुळे मुस्लिम धर्मियांनी ईदच्या दिवशी आपल्या घरीच थांबण्याचे आवाहन बहुतांश मौलवींनी केले होते.

मोबाइल मेसेजद्वारा पाठवला संदेश...
मोबाइल मेसेजद्वारा मुस्लिम लोकांमध्ये एक संदेश पाठवण्यात आला होता. सलमान खानचा 'किक' सिनेमा ईदच्या दिवशी पाहू नये, असे आवाहन त्यात करण्‍यात आले होते. सलमान खान ईदच्या मुहुर्तावर आपला सिनेमा रिलिज करत असतो.

भाई की फिल्म रिलिज हुई है मै तो जाऊंगा...
एका 30 वर्षीय ऑटो रिक्षा चालकाला नमाज अदा केल्यानंतर विचारले असता, तो म्हणाला, 'भाई की फिल्म रिलीज हुई है', ती सोडून कसे चालेल. दुसरीकडे, शहरातील 35 वर्षीय शिक्षक म्हणाले, मौलवीचे आवाहन योग्य आहे. सिनेमागृहात जाण्यापेक्षा घरी आपल्या कुटुंबीयांसोबत ईदचा आनंद साजरा केला पाहिजे.

सलमानच्या सिनेमाला यापूर्वीही झाला होता विरोध...
हैदराबादचे वादग्रस्त खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सलमान खानचा सिनेमा 'जय हो'ला विरोध दर्शवला होता. गेल्या मकर संक्रातला सलमान अहमदाबाद येथे पोहोचला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत सलमानने पतंगबाजीचा आनंद लुटला होता. या प्रसंगी सलमानने मोदी यांची भरभरून प्रसंशाही केली होती. त्याला काही म‍ुस्‍लि‍म संघटनांनी विरोध केला होता.
पुढील स्‍लाइडवर पाहा, सलमान खानची 'किक'मधील काही छायाचित्रे...
(फोटो : सलमानचा सिनेमा 'किक'चे पोस्टर)