आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narayan Sai Wife File Against Case In Madhyapradesh

पत्नीची नवी तक्रार; संपत्तीच नाही शिष्यांच्या बायकाही बळकावत होता नारायण साई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नारायण साईची पत्नी जानकी - Divya Marathi
नारायण साईची पत्नी जानकी
इंदूर (मध्यप्रदेश) - बलात्काराच्या खटल्यात तुरुंगात असलेल्या आसाराम यांचा मुलगा नारायण साईविरोधात त्याची पत्नी जानकी हरपलानी यांनी आज (शनिवार) नवी तक्रार दिली आहे. येथील खजराना पोलिस स्टेशनमध्ये त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की नारायणचा सासू-सासऱ्यांच्या संपत्तीवर डोळा आहे. एवढेच नाही तर त्याचे इतर महिलांसोबत लैंगिक संबंध होते.

शिष्यांच्या पत्नीवर असायची वाईट नजर
जानकी यांचा आरोप आहे, की नारायण साई आश्रमातील अल्पवयीन आणि सज्ञान मुलींना आमिष दाखवून, वशीकरण करुन, बळजबरी करुन किंवा धाक दाखवून त्यांच्यासोबत अवैध लैंगिक संबंध ठेवत होता. त्याची त्याच्या शिष्यांच्या संपत्तीवर आणि त्यांच्या बायकांवर वाईट नजर राहात होती. त्याने लंडनमधील बीना पटेलचा विवाह त्याचा शिष्य अंगदसोबत लावून दिला. मात्र, तिच्या गळ्यात मंगळसुत्र नारायण साईनेच टाकले आणि तिच्या भांगातही त्यानेच कुंक भरले होते. अशा प्रकारे कोणासोबतही संबंध प्रस्थापित करण्यासाठी तो वेगवेगळे फंडे वापरत होता.
आई-वडिलांची मालमत्ता विकली
जानकी म्हणाल्या, माझ्या आई-वडिलांची मालमत्ता नारायणसाईने बळकावली आणि त्याची परस्पर विक्री केली. ते पैसे आश्रमाला दान दिले. त्याने आमच्या पैशातून गुरुकुलसाठी बस खरेदी केली, त्याचे हप्ते माझे वडील फेडत होते.

तक्रार परत घेण्यासाठी धमकावले
जानकीचा आरोप आहे, की नारायण साई तिच्यावर तक्रार परत घेण्यासाठी दबाव टाकत आहे. तो फोन करुन धमकावतो असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. नारायण साईने पहिली पत्नी असताना दुसरा विवाह केल्याचा जानकी यांचा आरोप आहे. त्यामुळे त्यांनी पोटगीची मागणी केली आहे. हे प्रकरण जिल्हा न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहे. कौटुंबिक हिंसा आणि पोटगीच्या दाव्यात नारायण साईला नोटीस पाठवण्यात आली आहे.

जानकी यांचे वकील रोहित यादव म्हणाले, शनिवारी केलेल्या तक्रारीनूसार, नारायण साई यांच्यावर कलम 494,497,498 आणि 506 नूसार खटला दाखल करता येऊ शकतो.

पुढील स्लाइडमध्ये वाचा, साईच्या रासलिला... नऊ महिलांसोबत प्रणय करत होता