आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Asaram Bapus Son Narayan Sai Wife File Case In Indore Family Court For Maintenance

माझा पती व्याभिचारी आणि ढोंगी; नारायण साईची पत्नी जानकीने केले आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर- स्वयंघोषित संत आसाराम बापुंचा मुलगा आणि लैंगिक शोषणप्रकरणातील आरोपी नारायण साईवर त्याच्या पत्नीने गंभीर आरोप केले आहेत. नारायण साई व्याभिचारी आणि ढोंगी असल्याचे त्याची पत्नी जानकीने म्हटले आहे. तसेच नारायण साईची पत्नी म्‍हणून अपमानास्पद आयुष्य जगावे लागत असल्याचे तिने सांगितले. नारायण साई सध्या सुरतमधील तुरूंगात कैद आहे.

जानकीने इंदूर येथील फॅमिली कोर्टात पतीविरुद्ध खावटीचा दावा दाखल केला आहे. पतीने महिन्याला 80 हजार रुपये खावटी द्यावी, असे जानकीने याचिकेत म्हटले आहे. नारायण साई स्वत:च्या बचावासाठी वकीलांना महिन्याला लाखों रुपये देत आहे. मात्र, त्याची पत्नी जानकीवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे तिने नारायण साई विरोधात खावटीचा दावा दाखल केला आहे.
जानकीने दाखल याचिकेवर न्यायमूर्ती भारती बघेल यांच्या कोर्टात शुक्रवारी सुनावणी झाली. खटल्याचा निकाल लागेपर्यंत जानकीला तिच्या पतीने महिन्याला किमान 50 हजार रुपये खावटी द्यावी, अशी मागणी जानकीच्या वकीलांनी कोर्टाला केली आहे.

अॅड.सीमा शर्मा यांनी कोर्टात जानकीची बाजू मांडली. मा‍त्र, वकील पत्रावर आरोपी नारायण साईची स्वाक्षरी नसल्याने अॅड. अविनाश शिरपूरकर यांना बाजू मांडता आली नाही. यामुळे आरोपीची स्वाक्षरी घेण्याची अॅड. अविनाश शिरपूरकर यांना कोर्टाने परवानगी दिली आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 27 मार्च रोजी होणार आहे.

पुढील स्लाइडवर याचा, नारायण साईला प्रणयक्रीडेचे व्‍यसन, एकाच वेळी नऊ मुलींसोबत प्रणय ...