आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narayan Sais Wife Shilpa Register Case Against Him

युवतींना विदेशात नेत होता नारायण साई, पत्नी म्हणाली- \'संतच्या नावावर कलंक\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर- बलात्कारासह अनेक आरोप असलेले स्वयंघोषित आध्यात्मिक संत आसाराम बापू व त्यांचा मुलगा नारायण साई तुरुंगाची हवा खात आहेत. त्यात नारायण साईची पत्नी जानकी (37) हिने खळबळजनक खुलासा केला आहे. तो म्हणजे, आश्रमातील सेविकांसोबत सत्संगाच्या नावाखाली विदेशात फिरायला जात होता. तिथे त्यांच्यासोबत तो मदनचाळे करायचा. माझा पती आध्यात्मिक संत नसून तो संताच्या नावावर कलंक असल्याचेही जानकीने म्हटले आहे.

जानकीने पती विरुद्ध दिलेल्या कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय नारायण साईला नोटिस बजावून 20 नोव्हेंबरला हजर राहाण्याचे आदेश जिल्हा कोर्टाने दिले आहेत. जानकीने पतीकडून प्रतिमहिना 50 हजार रुपयांची पोटगी मिळण्यासाठी कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे.

जानकीने सांगितले की, नारायणसोबत तिचा विवाह 22 मे 1997 ला झाला होता. विवाहानंतर ती अहमदाबाद येथील महिला आश्रमात सासू लक्ष्मीसोबत राहात होती. नारायण साई विवाहानंतर पाच वर्षे ब्रह्मचर्याचे पालन करेल, असे आसाराम बापूने विवाहाच्या मंडपातच घोषणा केली होती. मात्र, नारायण साई या काळात विविध युवतींसोबत परदेशात फिरायला जात होता. इतकी सुंदर पत्नी असताना आपल्या मुलगा ब्रह्मचर्याचे पालन करत असल्याचे सांगून आसाराम बापू भाविकांच्या डोळ्यांत धूळफेक करत होता.

पुढील स्लाइड्‍सवर पाहा संबंधित फोटो..