आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi Attacks Congress In Madhya Pradesh Rally

कॉंग्रेसमुळेच मध्‍य प्रदेशची दुर्दशाः मोदींचा हल्‍लाबोल, पंतप्रधानांनाही टोला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्तरपूर- कॉंग्रेसचे उपाध्‍यक्ष राहुल गांधी यांची सभा एकीकडे फ्लॉप होत असतनाच भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्‍या सभेला तुफान गर्दी दिसून आली. मोदी यांची मध्‍य प्रदेशच्‍या छत्तरपूर येथे जाहीर सभा झाली. त्‍यावेळी त्‍यांनी कॉंग्रेसवर तोफ डागली. मध्‍य प्रदेशमध्‍ये 50 वर्षे कॉंग्रेसचे सरकार होते. त्‍यावेळी त्‍यांनी राज्‍याचा विकास का केला नाही, असा सवाल केला. कॉंग्रेसने मध्‍य प्रदेशची विल्‍हेवाट लावली, असे मोदी म्‍हणाले.

मध्‍य प्रदेशमध्‍ये 25 नोव्‍हेंबरला विधानसभेसाठी मतदान होणार आहे. त्‍यानिमित्त मोदींची रॅली आयोजित करण्‍यात आली होती. मोदींनी यावेळी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्‍यावरही हल्‍लबोल केला. ते म्‍हणाले, पंतप्रधान म्हणतात, की भाजपने राजकारणाचा दर्जा खाली आणला. परंतु, तुम्हीच काढलेल अध्‍यादेशाला नॉनसेन्‍स ठरविणारे तुमच्‍याच पक्षाचे नेते आहेत. त्‍यांनी आणि तुमच्‍याच पक्षाच्‍या लोकांनी तुमची आणि तुमच्‍या कार्यालयाची प्रतिमा मलीन केली. ज्यांनी तुम्हाला जखमा दिल्या त्यांना जर तुम्ही काहीच बोलू शकत नसाल, तर कमीत कमी आम्हाला तरी दोषी ठरवू नका, असाही उपरोधिक टोला मोदींनी लगावला.