आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘हाथ की सफाई’ या वेळी चालू देणार नाही : नरेंद्र मोदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंडला/बालाघाट - भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी शुक्रवारी मध्य प्रदेशात होते. त्यांनी मंडला आणि बालाघाटमध्ये प्रचारसभा घेतल्या. ‘काँग्रेसचा हात’ ओळखणे गरजेचे आहे. ते आधी हात मिळवतात, नंतर हात दाखवतात व हळूहळू ‘हाथ की सफाई’ सुरू करतात. मात्र, देश आता कोणाचेही असले प्रकार खपवून घेणार नसल्याची टीका मोदींनी केली. मुख्यमंत्री शिवराजसिंह यांच्या उपस्थितीत मंडला येथे झालेल्या सभेत मोदींनी काँग्रेस हा बेजबाबदार राजकीय पक्ष असल्याचे म्हटले. काँग्रेसची राजकीय विचारधारा लोकशाहीसाठी मारक आहे. त्यामुळेच देश काँग्रेसमुक्त करायचा आहे. सध्याच्या लोकसभा निवडणुका एखाद्याच्या विजय किंवा पराभवाच्या नाहीत, तर देशाच्या स्वप्नपूर्तीची पायाभरणी करणारी ही निवडणूक आहे. गेल्या 10 वर्षांत काँग्रेसच्या नेतृत्वातील सरकारने पाण्यात, जमिनीवर आणि हवेत असे सर्वत्र घोटाळे केले. त्याचे उत्तर सरकारने द्यायला हवे; पण देशाला लुटणारे असे करायला तयार नाहीत. त्यांचा अहंकार गगनात मावेनासा झाला आहे. जनतेला उत्तर देणे त्यांना योग्य वाटत नाही.

मध्य प्रदेशात मंडला आणि बालाघाटमध्ये नरेंद्र मोदींच्या प्रचार सभा
युवराजांवर टीका : नाव न घेता त्यांनी राहुल गांधींवर टीका केली. काँग्रेसचे युवराज मध्य प्रदेशात येऊन महिलांबरोबर चर्चा करतात; पण त्यांना महागाईची आठवण येत नाही. 2009 च्या निवडणुकांत 100 दिवसांत महागाई कमी करण्याचे आश्वासन दिले होते. जनतेने त्यावर विश्वास दाखवला. त्यांचे सरकारही स्थापन झाले; पण महागाई कमी होण्याऐवजी वाढतच आहे, असे ते म्हणाले.

पहिला मुक्काम - मंडला
- केंद्राकडून राज्यांना दिली जाणारी वागणूक योग्य नाही. आपण सर्व समान आहोत. आमचे सरकार हे धोरण राबवील. सर्व मुख्यमंत्र्यांना देशाच्या विकासासाठी एकत्र आणले जाईल.

- भारतात आदिवासी हजारो वर्षांपासून राहत आहेत. स्वातंत्रलढ्यातही त्यांचा सहभाग होता; पण काँग्रेसने कधीही त्यांचा गांभीर्याने विचार केला नाही.

- माजी पंतप्रधान वाजपेयी यांच्या एनडीए सरकारने सर्वप्रथम आदिवासी विकासासाठी स्वतंत्र मंत्रालय सुरू केले. त्यांच्यासाठी बजेटमध्ये स्वतंत्र वाटा ठेवण्यात आला.