भोपाळ/विदिशा - युवतीने युवकासोबत पंधरा दिवसांपासून बोलणे बंद केल्याने त्याने तिच्यावर चाकू हल्ला केला. बचावासाठी युवतीची मोठी बहिण मध्ये आली तर तिच्या हातावर घाव करण्यात आला, तर युवीतीच्या पायावर गंभीर घाव झाला आहे. पोलिसांनी आरोपी देवेंद्र गाडगे याला अटक केली आहे.
काय आहे प्रकरण
- युवतीवर चाकू हल्ला झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी महाराष्ट्रातील नाशिक शहरातील पंचवटी येथील 25 वर्षीय देवेंद्र गाडगे याला सोमवारी अटक केली.
- देवेंद्र समोवारी सकाळी गंजबासौदा येथील मंशापूर्ण मंदिर गल्लीतील युवतीच्या घरी आला होता. येथे युवतीने त्याच्यासोबत बोलण्यास नकार दिला. त्यानंतर संतप्त युवकाने तिच्यावर चाकू हल्ला केला. यात युवतीसह तिची मोठी बहिण प्रियंका जखमी झाली. मंगळवारी देवेंद्रला कोर्टात हजर करण्यात आले होते.
प्रेम-प्रकरणातून झाला हल्ला
ज्या युवतीवर हल्ला झाला ती ऊहर येथील राम-जानकी मंदिरातील संत ओमकारदास यांची भाची आहे. ओमकार दास यांचा शिष्यपरिवार भोपाळसह महाराष्ट्रातही आहे.
- नाशिकमधील पंचवटी येथील एक कुटुंब संत ओमकारदास यांचे भक्त आहे. दीडवर्षांपूर्वी ऊहर येथील राम-जानकी मंदिरातील धार्मिक कार्यक्रमासाठी देवेंद्र गाडगेचे कुटुंब नाशिकहून येथे आले होते.
- याच दरम्यान, देवेंद्र आणि युवतीची ओळख झाली. त्यानंतर युवतीही नाशिकला गेली होती. दीड वर्षांपासून दोघे एकमेंकाच्या संपर्कात आहेत.
- देवेंद्रचे म्हणणे आहे की 15 दिवसांपासून युवतीने त्याच्यासोबत मोबाइलवरील संभाषण बंद केले होते. त्यामुळे तो तिला प्रत्यक्ष भेटण्यासाठी आला होता.
देवेंद्र म्हणतो मंदिरात झाले लग्न
- युवतीचा आरोप आहे की देवेंद्र तिच्यावर लग्नासाठी बळजबरी करीत आहे. तर, युवकाचा दावा आहे की आमचे मंदिरात लग्न झाले आहे.
- देवेंद्रचे म्हणणे आहे की तो 15-15 दिवस प्रेयसीच्या घरी तिच्यासोबत राहिला आहे. मात्र गेल्या 15 दिवसांपासून युवतीने त्याच्यासोबत बोलणे बंद केले होते. त्यामुळेच तिला भेटण्यासाठी तिच्या घरी आलो होतो.
- पोलिस अधिकारी राकेश श्रीवास्तव यांनी सांगितले, की युवतींवर प्राणघातक हल्ला करण्याच्या आरोपात देवेंद्र गाडगेला अटक करण्यात आली आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, कोण आहे देवेंद्र गाडगे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)