आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nathuram Godse Practice Pistol In This River In Gwalior

या नदीपात्रात सराव करुन नथुराम गोडसेने महात्मा गांधींवर झाडल्या होत्या गोळ्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वाल्हेर (मध्य प्रदेश)- महात्मा गांधी यांची हत्या करण्याचा आरोप असणाऱ्या आरोपींना ग्वाल्हेरच्या अनेकांनी मदत केली होती. नथूराम गोडसेने येथील स्वर्णरेखा नदीच्या पात्रात पिस्तुलातून गोळी झाडण्याचा सराव केला होता. तेव्हा ग्वाल्हेर हिंदू महासभेचा एक गड होता. त्यामुळेच नथूराम गोडसे येथे आला होता.
या नदीत केला होता सराव
ग्वाल्हेर येथील डॉ. दत्तात्रेय परचुरे यांनी नथुराम गोडसेला पिस्तुल देण्यासह अनेक प्रकारे मदत केली होती. येथील शिंदे छावनी परिसरात असलेल्या नदीपात्रात गोडसेसह इतर आरोपींनी मिळून सराव केला होता. या ठिकाणी आधी डॉ. परचुरे यांचे घर होते. गांधींची हत्या झाल्यानंतर परचुरे कुटुंब शहरातील दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झाले.
हिंदू महासभेने केली मदत
हिंदू महासभेचे ग्वाल्हेर प्रमुख जयवीर भारद्वाज सांगतात, की तेव्हा हे शहर हिंदू महासभेचे केंद्र होते. डॉ. परचुरे यांनी हिंदू राष्ट्र सेनाही तयार केली होती. ते हिंदू महासभेशी संलग्न होते. त्यांच्या मदतीनेच गोडसे यांनी पिस्तुल मिळवले होते.
पुढील स्लाईडवर वाचा, डॉ. परचुरे यांच्या घरामागे सराव....परचुरे कुटुंब आता करते समाजसेवा....