आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

१९ हत्यांसाठीचा वाॅन्टेड नक्षलवादी अटकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बालाघाट - महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड आदी राज्यांतील पोलिसांना गेल्या २० वर्षांपासून गुंगारा देत असलेला कुख्यात नक्षलवादी दिलीप गुहा (खरे नाव दिलीप उईके)याला मध्य प्रदेश पोलिसांनी अखेर अटक केली. बालाघाट पोलिसांनी जिल्ह्यात सोनगुड्डा जंगलात कारवाई करून त्याला पकडले. त्याच्यावर तीन राज्यांत १९ हत्यांसह १३० गंभीर गुन्हे होते. तसेच पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी सुमारे ३२ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

बालाघाट नक्षल रेंजचे महासंचालक डी. एस. सागर, जिल्हा पोलिस अधीक्षक गौरव तिवारी यांनी सांगितले, दिलीप गुहा सहा - सात साथीदारांसोबत तेंदुपत्ता गोळा करणाऱ्या मुकादमांकडून अवैध वसुली व पोलिस, त्यांचे खबरे यांची हत्या करण्याच्या प्रयत्नात होता. दिलीप सीपीआयच्या (माओवादी) केडर बेसचा सदस्य होता. दिलीपवर मध्य प्रदेशने ३. ५० लाख, महाराष्ट्राने १६ लाख, छत्तीसगडने ८ लाख तर सीआरपीएफने ५ लाखांचे बक्षीस ठेवले होते.
बातम्या आणखी आहेत...