आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नकारात्मक विचाराने माणूस घाबरतो - आनंद कुमार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - आनंद कुमार म्हणाले, गेल्या 12 वर्षांत अतिशय गरीब कुटुंबातील 281 मुलांची निवड आयआयटी अभ्यासक्रमासाठी झाली आहे. घरात जेवणासाठी अन्न नाही, मात्र अभ्यास करण्याची अपार जिद्द असलेली ही मुले होती.


ज्या मुलांचे आई-वडील मोलमजुरी करत होते, अशी अनेक मुले माझ्याकडे होती. काही जणांच्या घरची परिस्थिती एवढी हलाखीची होती की, मुलांच्या शिक्षणावरील खर्चामुळे घरात दोनवेळचे अन्न शिजत नव्हते. सध्या अशाच कुटुंबातील मुले फ्रान्स, कॅनडासारख्या देशांमध्ये प्रोफेसर आहेत.


यावर्षी जॉइंट एन्ट्रन्स एक्झाम (जेईई) उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आयआयटी रुरकी, कानपूर, मुंबई आणि खरगपूरमध्ये शिकत आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना मी चार गोष्टी सांगितल्या, त्या मी तुम्हाला सांगतो. कोणत्याही मुलाने या गोष्टी अंगीकारल्यास एक-दोन वर्षांत त्यांचे आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही, हा माझा दावा आहे. हा आयुष्याचा मूलमंत्र आहे, परीक्षा उत्तीर्ण होण्यापर्यंत तो मर्यादित नाही.


डोक्यात कायम लक्ष्य असावे
स्वामी विवेकानंद यांची ईश्वराला भेटण्याची इच्छा होती. मात्र, त्यांना कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. रामकृष्ण परमहंस यांना हा विषय सांगितल्यावर त्यांनी विवेकानंदांचे डोके पाण्याने भरलेल्या भांड्यात घातले. गुदमरून गेल्याने त्यांनी मान बाहेर काढली, त्या वेळी रामकृष्ण म्हणाले, अशाच गुदमरण्याच्या स्थितीत ईश्वराचेही दर्शन होते. मुलांना ध्येयप्राप्तीची ओढ अशीच असायला हवी.


फक्त सकारात्मक विचार
कोणत्याही परिस्थितीत आपण सकारात्मक विचार करायला हवा. नकारात्मक विचार डोकावला की माणूस घाबरू लागतो. या वर्षी माझ्या क्लासेसमधील 30 पैकी 28 मुलांची निवड झाली आहे. दोघांची निवड न होण्यामागचे कारण त्यांच्यात कुठेना कुठे नकारात्मक विचार दडलेला आहे.


यशाचे दहा मंत्र
1. आयआयटीत जावयाचे की नाही यासाठी तुम्ही स्वत:चे मूल्यमापन करा.
2. आठवी ते दहावीपर्यंतचे गुण पाहा आणि या स्पध्रेत आपण कोठे आहोत याचा विचार करा.
3. बेसिक अभ्यासापासून सुरुवात करणार्‍या पुस्तकांची निवड करा.
4. विषयातील प्रत्येक संकल्पना समजली पाहिजे. का आणि कशामुळे या प्रश्नातून या संकल्पना समजतील.
5. न्यूमेरिकल्ससाठी थिअरीकडे दुर्लक्ष नको.
6. अकरावी-बारावीच्या संपूर्ण अभ्यासक्रमाचा अभ्यास पूर्ण व्हावा.
7. तीनही विषयांना सारखेच महत्त्व द्या.
8. आयआयटी क्वेश्चन बॅँक गेल्या 30-35 वर्षांच्या प्रश्नपत्रिकेनुसार तयार करा. जे प्रश्न एका प्रयत्नात सुटले नाहीत, त्यांना स्टार चिन्ह द्या व त्याचा सराव करा.
9. जास्तीत जास्त आयआयटी टेस्ट सिरीज ठरावीक वेळेत सोडवाव्यात.