आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेताजींची मुलगी म्हणाली, वडिलांसंबंधी फायली द्या, फायलींची कॉपी नाही मिळाली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - पश्चिम बंगाल सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संबंधित असलेल्या ६४ गोपनीय फाइल्स सार्वजनिक केल्या आहेत. केंद्राजवळ असलेल्या गोपनीय फाइल्स सार्वजनिक करण्याची मागणी बोस परिवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करत आहे. त्यातच आता नेताजी सुभाषचंद्र बोस यांची मुलगी अनिता बोस यांनीसुद्धा ही मागणी रेटून धरली आहे. अनिता बोस ७२ वर्षांच्या असून, अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्या परिचित आहेत. सध्या त्या जर्मनीमध्ये राहतात.
अनिता बोस म्हणाल्या की, पश्चिम बंगाल सरकारने माझ्या वडिलांशी संबंधित काही गोपनीय फाइल्स सार्वजनिक केल्या आहेत. मात्र, मला त्याची प्रत अजूनही मिळाली नाही. त्यामुळे मी त्यांच्याबाबत काही बोलू शकत नाही.

विशेष म्हणजे वडिलांच्या मृत्यूबाबत निश्चित काही सांगता येत नाही. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन करते की, केंद्र सरकारच्या जवळ असलेल्या गोपनीय फाइल्स त्यांनी सार्वजनिक कराव्यात. ज्यामुळे ७० वर्षांपूर्वी त्यांचे बेपत्ता होण्याच्या रहस्यावर पडदा पडेल. मला विश्वास आहे की, ३० वर्षांपेक्षा जास्त काळापासून कुलूपबंद असलेल्या फाइल्स सार्वजनिक केल्याच पाहिजेत. एक मुलगी या नात्याने मी मागणी करत आहे की, वडिलांशी संबंधित सर्व फाइल्स ह्या सर्वांसमोर ठेवल्याच पाहिजेत.