आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाच्या 27 दिवसांतच प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या, फोन कॉल्सवरुन लागला छडा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - लग्नाच्या 27 दिवसांतच पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केल्याचे उघड झाले आहे. यात युवतीचा आतेभाऊ देखील सहभागी होता. पोलिसांनी आरोपींच्या कॉल डिटेल्सवरुन या प्रकरणाचा छडा लावला आहे. पतीची हत्या झाल्यानंतर 25 दिवसांत पत्नीने 470 वेळा एकाच क्रमांकावर फोन आणि शेकडो एसएमएस केले होते.
प्रियकराला म्हणाली, पतीपासून मला मुक्त कर
सिहोर रोड येथील भैंसखेडा येथील डेअरी संचालक मनीष मीणा (23) या तरुणाचा 29 मे रोजी पुजासोबत विवाह झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुजाला हे लग्न मान्य नव्हते. लग्नानंतरच्या पहिल्याच रात्री तिने पतीला संबंध ठेवण्यास नकार दिला आणि पती-पत्नीचे नाते समजण्यास थोडा वेळ हवा असे सांगितले. त्यावरुन दोघांमधे वाद झाला आणि मनीषने पुजाला एक थप्पड लगावली. या घटनेनंतर दुसर्‍याच दिवशी पुजा माहेरी गेली. तिथे तिने प्रियकर वीरेंद्र मीणाची भेट घेऊन सर्व हकिकत सांगितली आणि मला पतीपासून मुक्त कर अशी विनवणी केली. यावेळी त्यांच्यासोबत पुजाचा आतेभाऊ संदीप देखील होता. प्रेयसीला मारल्याचा बदला घेण्यासाठी वीरेंद्रने संदीपसह मनीषच्या हत्येचा कट रचला.
कोल्ड ड्रिंकमधून दिल्या झोपेच्या गोळ्या
पुजा माहेरी आल्यानंतर वीरेंद्र आणि संदीप एसयुव्ही कार घेऊन मनीषला भेटण्यासाठी गेले. भैंसखेडा येथे पोहोचल्यानंतर त्यांनी फोन करुन मनीषला भेटीसाठी बोलावून घेतले. तो आल्यानंतर वीरेंद्रने त्याला बोलण्यात गुंतवून त्याच्या कोल्ड ड्रिंकमध्ये झोपेच्या गोळ्या टाकल्या आणि ते त्याला दिले. मनीष बेशुद्ध झाल्यानंतर वीरेंद्र आणि संदीपने उपरण्याने त्याचा गळा घोटला आणि मृतदेह कोल्हूखेडीच्या जंगलातील पाटवाटेवर फेकून दिला. दुसर्‍या दिवशी खजुरी सडक पोलिसांना मनीषचा मृतदेह सापडला.
मनीषचा शोध घेण्यात वीरेंद्र आघाडीवर
मनीष घरातून गायब झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांसह त्याचा शोध घेण्यात आरोपी वीरेंद्र आघाडीवर होता. कोणीही त्याच्यावर शंका घेतली नाही. मात्र, पतीच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी पुजाचे कॉल डिटेल्स पोलिसांनी तपासले. त्यात 25 दिवासांमध्ये एकाच क्रमांकावर 470 वेळा फोन केल्याचे समोर आले. एकाच क्रमांकावर अर्धा ते पाऊन तास ती बोलत असल्याचे त्यातून समजले. त्यासोबतच मनीषची हत्या केल्यानंतर वीरेंद्रने एसएमएस करुन तिला कळवल्याचेही उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

(छायाचित्र - आरोपी पुजा. हिचा काही दिवसांपूर्वीच मनीषसोबत विवाह झाला होता. )