आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदाबादला बर्ड फ्लूचा धोका; चिनी कोंबड्यांचा पॉझिटिव्ह अहवाल, १० किलोमीटर क्षेत्र प्रभावित घोषित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद- शहरावर बर्ड फ्लू (एच ५ एन १)चे सावट अाहे. तथापि, पूर्व अहमदाबादच्या हाथीजण भागात सोमवारी बेवारस अवस्थेत मिळालेल्या चिनी कोंबड्यांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अहवालानंतर अहमदाबादचे जिल्हाधिकारी यांनी हाथीजण व आसपासच्या एका किलोमीटर क्षेत्रास अतिसंवेदनशील तथा १० किलोमीटरचे क्षेत्र बर्ड फ्लू प्रभावित घोषित केले आहे. पशुपालन विभागाचे संचालक डॉ. अमित कानाणी यांनी सांगितले की, बर्ड फ्लू वाहक विषाणू अन्य प्राण्यांमध्येही पसरू शकतात. हाथीजण व त्याच्या जवळील भागातील अन्य पोल्ट्री फार्ममध्ये असलेल्या कोंबड्यांची तपासणी केली जाणार आहे. गरज वाटल्यास नष्ट करण्याची कारवाईदेखील केली जाऊ शकते.
 
संशयित प्रकरणे ओळखण्यासाठी पाहणी : आरोग्य तथा पशुपालन विभागाने या चिन्हित क्षेत्रात पाहणी सुरू केली आहे. जेणेकरून हे कळावे की, या क्षेत्रात कोणत्याही व्यक्तीला संदिग्ध आजार तर नाहीये ना हे पाहणे. गुजरातची राजधानी असलेल्या या शहरात सर्वतोपरी प्रशासन बर्ड फ्लूचा धाेका टाळण्याचा प्रयत्न करत आहे.

पक्ष्यांच्या विल्हेवाटीची मोहीम 
सध्या परिस्थिती पाहता पशुपालन विभागाने कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द केल्या आहेत. त्यांना बोलावून संक्रमित पक्ष्यांची विल्हेवाट लावण्यासाठीची जबाबदारी सोपविली गेली आहे. जिल्ह्याधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पशुपालन विभागाच्या चार तुकड्यांच्या मदतीने बदक, इमी तसेच गिनी (चिनी कोंबडी) आदी १५०० पक्ष्यांना जमिनीत दफन करण्यात आले आहे. 
बातम्या आणखी आहेत...