आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तामिळनाडू, मध्य प्रदेशनंतर आता उ.प्र.तही 5 रुपयांत जेवण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
लखनऊ - तामिळनाडू आणि मध्य प्रदेशच्या धर्तीवर आता उत्तर प्रदेशातही अत्यंत स्वस्तात पोटभर जेवणाची व्यवस्था केली जाणार आहे. गरिबांना भोजन उपलब्ध करून देण्याच्या या योजनेनुसार ५ रुपयांमध्ये जेवण दिले जाईल, अशी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी रात्री एका ट्विटद्वारे माहिती दिली. 

वास्तविक, उत्तर प्रदेशात मजुरांना दहा रुपयांमध्येच पोटभर जेवण दिले जात आहे. आता “अन्नपूर्णा भोजनालय’ योजनेनुसार विद्यार्थी, मजूर आणि गरिबांना ५ रुपयांमध्ये जेवण दिले जाईल. पहिल्या टप्प्यात वाराणसी, गोरखपूर, कानपूर, लखनऊ आणि गाझियाबादमध्ये ही भोजनालये सुरू केली जातील. राज्यातील १८ ठिकाणी भिकाऱ्यांसाठी निवारागृहे सुरू करणार असून भोजन, शिक्षण आणि अन्य सुविधाही उपलब्ध केल्या जाणार आहेत. हा प्रस्ताव उत्तर प्रदेश विधानसभेच्या आगामी अधिवेशनात मांडला जाईल.
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...