आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

DM SPL : जुगाडातून बनवले मीटर, पेट्रोल भरतानाच कळेल अचूक प्रमाण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वाल्हेर - मध्य प्रदेशाच्या ग्वाल्हेरच्या एका युवकाने जुगाड तंत्राचा वापर करत पेट्रोल किंवा डिझेल भरताना किंवा गाडी चालवताना गाडीमधील इंधनाची अचूक माहिती सांगणारी प्रणाली विकसित केली आहे. ही माहिती अंकात आणि मिलिलिटर्समध्येही अचूक मिळते. “दिव्य मराठी नेटवर्क’च्या चमूने वजन मापन विभागाच्या माध्यमातून शहरातीलच एका पेट्रोल पंपावर जाऊन या प्रणालीची तपासणी केली असता पंपातून टाकण्यात अालेल्या पेट्रोलची योग्य माहिती मिळाली. ही प्रणाली भविष्यात किती उपयोगी ठरेल हे जरी सांगता येत नसले तरी जर अशी
व्यवस्था असेल तर पेट्रोल पंपावर होणाऱ्या चोरीला आळा बसू शकतो.   
 
सध्या पेट्रोल पंपावर वाहनांमध्ये पेट्रोल भरण्यासाठी अॅनालॉग प्रणालीचे मीटर असतात, ज्यानुसार पेट्रोलच्या टँकमध्ये प्लास्टिकचा एक बॉल (बॉल फ्लोट किंवा बॉल पेट्रोलगॅज) लावलेला असतो. हा बॉल जितका वरती जाईल, पेट्रोल मोजण्यासाठी लागलेल्या मीटरचा काटा/बार त्याचा हिशेब दाखवतो. मात्र, यामध्ये सध्या नेमके किती पेट्रोल आहे आणि पेट्रोल पंपातून किती पेट्रोल टाकण्यात आले याची अचूक माहिती मिळू शकत नाही. तसेच चढ-उताराच्या रस्त्यावर हे मीटर चुकीचा आकडा दाखवते. मात्र, नवीन डिजिटल न्यूमेरिक मीटरच्या माध्यमातून पेट्रोलची योग्य माहिती मिळू शकते.  चितेराओली येथील रहिवासी असलेल्या दीपकने त्यांच्या डिजिटल मीटरमध्ये रीडिंगसाठी पेट्रोल टँकमध्ये तीन सेन्सर लावलेले आहेत. यातील पहिला टँकच्या वरच्या भागात इन्फ्रारेड प्रोक्सिमेटली, जो टाकीच्या रिकाम्या भागाचा माप घेतो. दुसरे अल्ट्रासोनिक टान्स ड्यूसर, जो टाकीच्या खालील भागात लावलेला आहे. हा टाकीमध्ये सध्या असलेल्या पेट्रोलचे माप घेतो. यामुळे पंपावर टाकण्यात आलेल्या पेट्रोलचेही माप समजते. हे दोन्ही सेन्सर मीटर बॉक्समध्ये लावलेल्या प्रोसेसरमध्ये डाटा पाठवून पेट्रोलचे योग्य वजन सांगतात. या मीटरच्या पेटंटसाठी दीपक आता अर्ज करणार आहेत.
 
 इलेक्ट्रॉनिक्समध्ये बीई झालेला दीपक एका कंपनीमध्ये सेल्स सर्व्हिस मॅनेजर आहेत. त्यांच्या बाइकमध्ये भरलेले पेट्रोल अपेक्षेपेक्षा कमी वेळात संपत असल्याने त्यांना पेट्रोलच्या योग्य प्रमाणावर शंका आली. त्यातूनच पेट्रोलचे प्रमाण कळू शकणारे मीटर बनवण्याचा विचार आला. या दृष्टीने कामाला सुरुवात केली आणि त्यात यश मिळाले. 
 
योग्य प्रमाण समजले
- दीपकच्या न्यूमेरिक डिजिटल मीटरचे परीक्षण केले. यामध्ये पेट्रोलचे योग्य प्रमाण समजले. दुचाकी वाहनचालकांना यामुळे पेट्रोलमध्ये होणाऱ्या फसवणुकीतून सुटका मिळेल.
- सुरेंद्रसिंह घुरैया, उपनियंत्रक, नापक विभाग