आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्य प्रदेशातील आत्महत्यांचे सत्र सुरूच, आणखी एक मृत्यू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
खरगोन - मध्य प्रदेशातील आत्महत्यांचे सत्र अद्यापही थांबलेले नाही.  आणखी एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. गेल्या महिन्यातील हिंसक निदर्शनानंतर आत्महत्या कमी झालेल्या नाहीत.
 
ताकेसिंग (५५) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. ताकेसिंग यांनी ४ जुलै रोजी विष प्राशन करून जीवनयात्रा संपवली. ही घटना अजनगाव-पिपलियामध्ये घडली. त्यांच्यावर कर्जाचा डोंगर होता. हातून पीक गेल्याने त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला, असे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले. त्यांच्यावर ८ ते १० लाख रुपयांचे कर्ज झाले होते. त्याची फेड करण्यावरून ते तणावाखाली होते.
 
मिरचीच्या पिकाचेही नुकसान झाले होते. त्यामुळे ताकेसिंग यांच्या सर्व आशा मावळल्या होत्या. ४ जुलै रोजी ताकेसिंग यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर आतापर्यंत उपचार सुरू होते. मात्र बुधवारी सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. दुसरीकडे प्रदेश काँग्रेसने राज्यात ५५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा केला आहे. 
बातम्या आणखी आहेत...