आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुसळधार पावसामुळे मध्य प्रदेशात पूर, ११ जणांचा मृत्यू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ | मध्य प्रदेशात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भोपाळसह २५ जिल्ह्यांत पूरसदृश स्थिती आहे. पावसामुळे विविध दुर्घटनांत ११ जणांचा मृत्यू झाला आहे.
शेकडो गावे पाण्याखाली गेली आहेत. दीड लाख लोकांना पावसाचा फटका बसला आहे. ४०० जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. नर्मदेच्या पाण्याने धोक्याची पातळी आेलांडली आहे. होशंगाबादच्या रेल्वे पुलापासून हा धोका सात फूट अंतरावर आहे. देवासमध्ये नर्मदा नदी धोक्याच्या पातळीपेक्षा पाच फूट उंचीवरून वाहत आहे. अनेक भागात अन्नपदार्थांचा तुटवडा जाणवत आहे. लष्कराच्या दोन पथकांमार्फत येथे बचावकार्य करण्यात येत आहे.
भोपाळ शहरात शुक्रवारी रात्रीपासून १० तासांत १० इंच पाऊस पडला आहे. अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. बैत्ूलमध्ये राष्ट्रीय महामार्गावर पाणी आल्याने ३२ तासांपर्यंत वाहतूक ठप्प झाली होती. या काळात १९ िकमीपर्यंत ६ हजार वाहनांची रांग लागली होती.
दोन दिवसांत मान्सून देशभर
दरम्यान, तीन दिवसांत दक्षिण-पश्चिम मान्सून संपूर्ण देशभरात मान्सून पोहोचेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. त्यामुळे कोकण, विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र, कच्छ, गुजरात, पश्चिम राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक,केरळ, छत्तीसगड, उत्तराखंड, पश्चिम उत्तर प्रदेशात जोरदार तसेच मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...