आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पांढुर्ण्याच्या गोटमारीत ६३५ भाविक जखमी, येथे पोळ्याच्या दिवशी होत असते ऐतिहासिक गोटमार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरूड- मध्यप्रदेशातील पांढुर्णा सावरगावच्या सीमेवर पोळ्याच्या दिवशी होणारी ऐतिहासिक गोटमार शुक्रवारी उत्साहात पार पाडली. या गोटमारीत सावरगाव येथील ३५० तर पांढुर्णा येथील २८५ हून अधिक भाविक जखमी झाले. काही जखमी भाविकांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूर येथे हलवण्यात आले, तर उर्वरित जखमींवर पांढुर्णा येथील आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. दोन्ही गावांपैकी कुण्याही भाविकाला ऐतिहासिक झेंडा तोडता आल्याने रात्री उशिरापर्यंत गोटमार सुरू होती. या वेळी कडेकोट बंदोबस्त असल्याने शांततेत गोटमार पार पडली. मध्य प्रदेशातील पांढुर्णा येथे पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी ऐतिहासिक गोटमार केली जाते. अनेक वर्षांपूर्वी पेंढाऱ्यांना पळवण्यासाठी ही गोटमार सुरू करण्यात आली, तर काही जणांच्या मते तत्कालीन प्रेमविवाहाला विरोध करण्यासाठी ही गोटमार केली जात होती, अशी आख्यायिका आहे. पांढुर्णा सावरगाव येथील युवक-युवतीने अनेक वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. विवाहाला विरोध करून सावरगावच्या वधूला पांढुर्ण्यात येता येऊ नये म्हणून गोटमार करण्यात आली होती. त्या वेळी या गोटमारीत विवाहित प्रेमीयुगुलाचा मृत्यू झाला होता. या जोडप्याला चंडीमातेच्या मंदिराजवळ समाधी देण्यात आली होती. त्यांच्या स्मृतीचे प्रतीक म्हणून शेकडो वर्षांपासून दरवर्षी ही गोटमार करण्यात येते, अशी आख्यायिका आहे.
पांढुर्णा येथील ऐतिहासिक गोटमारीत गोटमार करताना नागरिक.
बातम्या आणखी आहेत...