आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काही वेळातच लिव्‍हर पोहोचवले जाते शेकडो KM दूर, जाणून घ्‍या पूर्ण प्रक्रिया

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - इंदूरमध्‍ये ब्रेन डेड झालेल्‍या 20 वर्षीय सोनिया चौहान हिच्‍या अवयवांचे दान करण्‍याचा निर्णय तिच्‍या पालकांनी घेतला. सोनियाचे हृदय आणि यकृताने दोन लोकांना नवीन जीवन दिले आहे. रविवारी सकाळी सोनियाचे अवयव मुंबई आणि दिल्‍ली येथे प्रत्‍यारोपणासाठी पाठवण्‍यात आले आहेत. त्‍यासाठी इंदूर, दिल्ली आणि मुंबई या शहरांमध्‍ये खास ग्रीन कॉरिडॉर तयार करण्‍यात आले होते. यकृत दिल्लीतील लिवर इंस्टीट्यूटमध्‍ये तर, हृदय मुंबईतील फोर्टिस हॉस्‍पिटलमध्‍ये पोहोचवण्‍यात आले आहेत. या संग्रहात जाणून घ्या अवयव प्रत्‍यारोपणासंदर्भात काही खास बाबी.
शनिवारी मालवीय नगरातील सोनिया यांचे निधन झाले. त्‍यांचे वडील गणेश चौहान यांनी अवयव दानाचा निर्णय घेतला. त्‍यानंतर आयुक्‍त संजय दुबे आणि डॉक्‍टरांच्‍या टीमने गरजू रूग्‍णांच्‍या नातेवाईकांशी संपर्क करून प्रत्‍यारोपणाची व्‍यवस्‍था केली.

अशी आहे प्रक्रिया...
- ब्रेन डेड झालेल्‍या व्‍यक्‍तीच्‍या अवयव दानासंदर्भात नातेवाईक निर्णय घेऊ शकतात.
- अवयव दानाची परवानगी मिळाल्‍यावर हॉस्‍पिटल स्‍थानिक प्रशासनाला माहिती देते.
- मृत व्‍यक्‍तीच्‍या कोणत्‍या अवयवांचे प्रत्‍यारोपण होऊ शकते याची तपासणी केली जाते.
- प्रशासन आणि डॉक्‍टर देशभरात संपर्क करून गरजू रूग्‍णांची माहिती घेतात.
- अवयव दाता आणि रूग्‍ण यांचा रक्‍तगट जुळल्‍यास पुढील प्रक्रियेला सुरूवात केली जाते.
- अवयव काढण्‍याआधी संबंधित हॉस्‍पिटलपर्यंत ग्रीन कॉरिडॉर तयार केला जातो.
- ज्‍या मार्गावरून रूग्‍णवाहिका जाईल ते सर्व रस्‍ते मोकळे केले जातात.
- रूग्‍णवाहिकेला वाहतूकीची अडचण होणार नाही याची पोलिस खबरदारी घेतात.
- रूग्‍णवाहिकेसमोर पोलिसांचे वाहन असते. वेगवान रूग्‍णवाहिकेसाठी हा रस्‍ता काही काळासाठी आरक्षित केला जातो म्‍हणून त्‍याला 'ग्रीन कॉरिडॉर' म्‍हणतात.

पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून वाचा, अवयव दानासाठी लागणारा खर्च, कोणती घ्‍यावी लागते काळजी, यासह काही महत्‍त्‍वपूर्ण बाबी...