आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

61 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या न्यायमूर्तीने न्यायालयासमोर दिले धरणे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जबलपूर - मध्य प्रदेशमध्ये जबलपूर उच्च न्यायालयाच्या ६१ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या न्यायमूर्तीने न्यायालयासमोर धरणे दिले आहेत. मंगळवारी ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी व अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश(एडीजे) आर.के. श्रीवास आंदोलन करत आहेत.
 
१५ महिन्यांत चार वेळा बदली होणे हे त्यांच्या विरोधामागचे कारण आहे. सत्य बोलल्यामुळे वारंवार बदली करून छळ केला जात असल्याचा त्यांचा आरोप आहे. ते बुधवारीही धरणे आंदोलन करतील. मी मुख्य न्यायमूर्ती व रजिस्ट्रार जनरलना आपल्यावरील अन्यायाची माहिती दिली आहे. असे असताना उच्च न्यायालय प्रशासनाकडून आतापर्यंत कोणतेही सकारात्मक उत्तर मिळाले नाही. दर ४ महिन्याला बदली झाल्यामुळे कुटुंबाला त्रास झाला. या वेळी जबलपूरच्या ख्राइस्ट चर्च स्कूलमध्ये मुलाने प्रवेश घेतला होता.  नीमचमधून बदली झाल्यामुळे एकाला शिक्षणासाठी तिथेच ठेवावे लागले. १५ महिन्यांत एखाद्या न्यायमूर्तीची चार वेळा बदली हायकोर्ट बदली धोरणाच्या विरुद्ध आहे. या व्यवस्थेचा ८० टक्के लोकांना त्रास होतो, मात्र कोणी बोलत नाही. मी मात्र संघर्षाचा रस्ता निवडला आहे. मी नीमचला रुजू झालो नाही. नोकरी धोक्यात घालून आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. मी तुरुंगात जाण्यासही तयार आहे. मात्र, अन्याय कोणतीही किंमत मोजून सहन केला जाणार नाही. माझा जन्म केवळ नोकरीसाठी नाही. मी चुकीचा ठरलो तर तत्काळ राजीनामा देण्यास तयार आहे. मी एक न्यायमूर्ती आहे त्यामुळे मलाही न्याय मिळायला हवा. न्याय न मिळाल्यास धरणे आंदोलनानंतर उपोषणही करेन. दुसरीकडे, एडीजेच्या समर्थनार्थ बार काउंसिलचे वकील उभे राहिले आहेत. कडक उन्हात धरणे देत असलेल्या श्रीवास यांच्यासाठी वकील मंडपाची व्यवस्था करत आहेत.
 
गेल्या १५ महिन्यांत बदल्या
- ११ एप्रिल २०१६ : धारहून शहडोलला बदली.
- २७ ऑगस्ट २०१६ : शहडोलहून सिहोरला बदली.
- ७ मार्च २०१७ : सिहोरहून जबलपूर हायकोर्ट.
- २१ मार्च २०१७ : जबलपूरहून नीमच.
- श्रीवास २००० मध्ये सिव्हिल जज, द्वितीय वर्ग-२ म्हणून रुजू. १७ वर्षांत त्यांच्या १२ वेळा बदल्या.
बातम्या आणखी आहेत...