आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलराज मिश्र म्हणाले- मी तर ७५ चा झालो अन् मंत्रीही आहे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - केंद्रीय लघू उद्योगमंत्री कलराज मिश्र म्हणाले, ‘मी तर ७५ वर्षांचा झालो आणि मंत्रीही आहे’ पंच्याहत्तरी आेलांडलेल्या नेत्यांना सक्रीय राजकारणात ठेवायचे नाही, असा भाजपने निर्णय घेतला आहे, याची मला कल्पना नाही. असा निर्णय पक्षाने घेतला आहे, असे जे सांगत आहेत. त्यांनाच जाऊन विचारा, की मंत्रीपदावरून निवृत्त होण्याचे वयही आता निश्चित झाले आहे. मिश्र बुधवारी भोपाळ येथे पत्रकारांशी चर्चा करत होते.

गौर म्हणाले : पक्ष संविधान सर्वांसाठी सारखाच हवा दरम्यान, माजी गृहमंत्री बाबूलाल गौर म्हणाले की, मला ७५ वर्षांच्या फॉर्म्यूल्यानुसार, मला पदावरून हटवण्याची माहिती पक्षाचे राष्ट्रीय महामंत्री रामलाल यांनी दिली होती. परंतू कलराज मिश्र जर असे म्हणत असतील तर त्यांना पक्षाने घेतलेल्या निर्णयाबद्दल त्यांना माहिती नाही. मी याबाबत पक्षाच्या वरिष्ठांशी बोलणार आहे. कारण पक्षाचे संविधान सर्वांसाठी सारखेच आहे.
बातम्या आणखी आहेत...