आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

81% लोक म्हणाले : सकारात्मक वृत्तपत्राने आनंद तर मिळतोच, पण विचारही बदलतात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - वाचकांच्या जीवनावर बातम्या किती परिणाम करतात याचे उत्तम उदाहरण भास्कर समूहाची ‘नो निगेटिव्ह न्यूज’ मोहीम ठरत आहे. दर सोमवारच्या नो निगेटिव्ह वृत्तपत्राने वाचकांचे जीवन सकारात्मक बनवण्यात योगदान दिले आहे. ‘भास्कर समूहा’चे नो निगेटिव्ह वृत्तपत्र वाचल्यानंतर वाचकांवर काही तासांनंतरही सकारात्मक परिणाम जाणवतो, हे जगप्रसिद्ध संशोधन संस्था ‘इप्सॉस’ आणि देशातील प्रसिद्ध संशोधन संस्था ‘मार्केट सेपियन्स’च्या नव्या संशोधनाने प्रमाणित झाले आहे.

‘प्रत्येक सोमवारी नो निगेटिव्ह न्यूज’ ही मोहीम सुरू होऊन एक वर्ष झाले आहे. गेल्या सोमवारी १८ जानेवारीला त्याच्या वर्षपूर्तीनिमित्त विशेष जॅकेटसह सकारात्मक बातम्या असलेले वृत्तपत्र प्रकाशित करण्यात आले. त्यानिमित्त इप्सॉस आणि मार्केट सेपियन्सने देशातील ८ शहरांत वाचकांचा अभ्यास केला. सकारात्मक बातम्या वाचल्यानंतर वाचकांचा दृष्टिकोन आणि विचार यावर काय परिणाम होतो, हे त्या माध्यमातून अभ्यासण्यात आले. अभ्यासात सहभागी १२५० लोकांचे दोन गट करण्यात आले. एका गटाला नो निगेटिव्ह न्यूजच्या वर्षपूर्तीनिमित्तचा दैनिक भास्कर आणि दुसऱ्या गटाला इतर वृत्तपत्रे देण्यात आली. चार ते सहा तासांनंतर या लोकांशी पुन्हा संपर्क करून त्यांची प्रतिक्रिया विचारण्यात आली. ज्यांनी भास्कर समूहाचे नो निगेटिव्ह वृत्तपत्र वाचले त्यापैकी ८१% लोक म्हणाले की, सकारात्मक वृत्तपत्र वाचल्यानंतर पूर्ण दिवस आनंद वाटला. सकारात्मक बातम्यांमुळे फक्त आनंदच मिळतो असे नाही तर विचारावरही परिणाम होतो, असे संशोधनातून समोर आले. आपल्याला जे हवे ते मिळवू शकतो, आपल्यात तेवढी क्षमता आहे, असे नो निगेटिव्ह वृत्तपत्र वाचल्यानंतर ७९% लोकांना वाटले. ७९% लोकांनी असेही सांगितले की, त्यांना आज आपल्या जीवनात समाधान, आनंद वाटत आहे.
सकारात्मक बातम्या वाचकांना प्रेरितही करतात. ७८% लोकांच्या मते, नो निगेटिव्ह वृत्तपत्र वाचल्यानंतर काम चांगल्या पद्धतीने करण्याच्या दृष्टीने आपण सकारात्मक झालो आहोत, असे वाटते. त्याचबरोबर समाज चांगला व्हावा यासाठी सकारात्मक योगदान देऊ शकतो, असा विचारही निर्माण झाला. या अभ्यासात एक महत्त्वाची बाब पुढे आली ती म्हणजे सकारात्मक बातम्या वाचून देश आणि जगाबाबतचा आपला दृष्टिकोन सकारात्मक होत जातो. ७५% लोकांच्या मते या देशात आपले भविष्य उज्ज्वल आहे, तर ६८% लोक म्हणाले की, जगात चांगले लोक खूप आहेत.
सकारात्मक बातम्यांचा परिणाम असा
विविध अभ्यासांनुसार, दिवसाची सुरुवात ध्यान, संगीत, रचनात्मक छंद अशा सकारात्मक कामांनी केली तर मेंदूत डोपामाइन हे द्रव्य तयार होते. ते माणसाचा मूड काही वेळासाठी चांगला बनवते. ते उत्साहित करते आणि ध्यान केंद्रित करण्यातही योगदान देते. डोपामाइनचा परिणाम काही वेळच राहतो. वैद्यकीय अभ्यासात त्याच्या दीर्घ प्रभावाच्या अवधीवर अजून शिक्कामोर्तब बाकी आहे.