आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२२ एप्रिल रोजी उज्जैनच्या क्षिप्राकिनारी सुरू होणार सिंहस्‍थ कुंभ मेळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उज्जैन - कुंभमेळ्यात ताटातूट झालेल्यांचे अनेक किस्से आपण ऐकून आहोत. मात्र या सिंहस्थात असे होणार नाही. पोलिसांनी तरी हा दावा केला आहे. या सिंहस्थाला ५ कोटी लोक येण्याची शक्यता आहे. नियंत्रण कक्षात २६ भाषांचे जाणकार नियुक्त करण्यात आले आहेत. सिंहस्थाच्या संकेतस्थळाच्या माध्यमातून कोणालाही शोधणे सोपे होणार आहे. मेळ्याच्या परिसरात मोठा पडदा लावण्यात येईल. यावर बेपत्ता व्यक्तीची माहिती अपडेट करण्यात येणार आहे. सिंहस्थाची आैपचारिक सुरुवात २२ एप्रिलपासून होत आहे. २१ मेपर्यंत हे पर्व सुरू राहील.
सिंहस्थात शाही स्नानाच्या दिवशी लोकांची गर्दी २ कोटींपर्यंत वाढू शकते. इतर दिवशी दररोज १० लाख लोकांची वर्दळ राहणार आहे. त्यांना सुखरूप घरी पाठवण्याची जबाबदारी प्रशासन व पोलिस विभागाची आहे. बेपत्तांच्या नियंत्रण कक्षाचे प्रभारी उपपोलिस अधीक्षक अमरेंद्र सिंह यांनी सांगितले की, लोकांची ताटातूट होणे आम्ही टाळू शकत नाही. मात्र त्यांना लवकरात लवकर पुन्हा नातलगांपाशी पोहोचवण्याची जबाबदारी आम्ही पार पाडू. मातृशक्ती जागरण बाल संरक्षण उपसमितीच्या ५०० पेक्षा अधिक प्रशिक्षित महिला स्टेशन व बसस्थानकावर तैनात राहतील. प्रवाशांसोबत असलेल्या लहान मुलांच्या गळ्यात आेळखपत्र अडकवण्याचे काम ही समिती करेल. यावर मुलाचे नाव, पालकांचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक असेल. मूल हरवलेच तर याचा उपयोग होईल.
बेपत्तांच्या भाषेत होणार घोषणा
देशातील ९० % लोक जवळपास २२ भाषा बोलतात. यात माळवा, निमाड आणि विंध्यांचलमधील प्रचलित बोलीभाषा सामील केल्यास २६ भाषा होतात. या सर्व भाषांचे जाणकार नियंत्रण कक्षात असतील. ते बेपत्ता व्यक्तीच्या भाषेत उद््घोषणा करतील. सोबतच संकेतस्थळावर त्या व्यक्तीचे वर्णन, भाषा, कपडे यांची माहिती अपलोड केली जाईल. या संकेतस्थळाला मेळा परिसरातील ५१ ठाण्यांसह जगभरातील लोक पाहू शकतील. महिला सशक्तीकरण विभाग १० बेपत्ता मदत केंद्र उभारणार आहे.
पुढील स्‍लाइडवर वाचा, किन्नर अाखाडा व अाखाडा परिषदेत नव्या वादाला तोंड ... कलंदर बाबा; उन्हाळ्यात रेतीवर, तर हिवाळ्यात थंड पाण्यात करणार साधना...