आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उज्जैनमध्ये २० मार्चला होणार यात्रा आणि महाआरती सोहळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - उज्जैनमध्ये पुढील महिन्यात जगातील सर्वात मोठा धार्मिक सोहळा सिंहस्थ महापर्वाचा प्रारंभ होणार आहे. सिंहस्थाची तयारी सुरू असताना दैनिक भास्करच्या वतीने उज्जैनमध्ये २० मार्च रोजी यात्रा आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात हजारो भाविक सहभागी होणार आहेत.

यात्रेचा प्रारंभ क्षीरसागर येथून होणार असून ती क्षिप्राच्या रामघाटापर्यंत नेण्यात येणार आहे. त्यानंतर तेथे महाआरती होणार आहे. राम घाटावर गंगा आरतीच्या धर्तीवर क्षिप्राची महाआरती केली आहे. या महाआयोजनात दैनिक भास्करचे सर्व वाचक सादर निमंत्रित आहेत.
मध्य प्रदेशात पुढील महिन्यात सुरू होत असलेल्या सिंहस्थ सोहळ्याची जोरदार तयारी करण्यात येत आहे. या अनुषंगाने पूर्वतयारी म्हणून हा कार्यक्रम होणार आहे. महाकालची सवारी, माता क्षिप्राची पालखी, विशला अमृत कलश, हत्ती घोड्यांवर साधु रूपात सजलेले शेकडो लोक या यात्रेत दिसतील तेव्हा संपूर्ण अवंतिका नगरी सिंहस्थाच्या रंगात रंगल्याचा भास होईल. हजारो भाविक या अनुपम सोहळ्याचे साक्षीदार होणार आहेत. विविध सामाजिक व धार्मिक संघटनांनीही यात सहभागी होण्याचे मान्य केले आहे. राम घाटावर महाआरती तो या सोहळ्याचा सर्वोच्च क्षण असेल. यात १० हजार लोक घंटा, झांझा घेऊन क्षित्रा नदीची आरती गातील. त्यात घंटा व झांझांचे वितरण दैनिक भास्करतर्फे केले जाणार आहे. श्री क्षिप्रा महासभेच्या सहकार्याने या महाआरतीचे आयोजन करण्यात या वेळी रामघाटावर तसेच क्षिप्रा नदीच्या किनारी दीपोत्सवही साजरा केला जाणार आहे.
बातम्या आणखी आहेत...