आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साईंवर वक्तव्य; स्वरूपानंदांची दिलगिरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ- शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी साईबाबांविषयी वादग्रस्त वक्तव्यांबद्दल माफी मागितली आहे. शंकराचार्यांच्या वकिलाने मध्य प्रदेश हायकोर्टात सांगितले की, वक्तव्यांमुळे धार्मिक भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल खेद व्यक्त करत आहे. सरस्वती यांनी देव म्हणून साईबाबांच्या पूजेला विरोध केला होता.
यामुळे त्यांच्याविरुद्ध हायकोर्टात याचिका दाखल झाली होती. तथापि, त्यांचे वकील प्रदीप गुप्ता यांच्यामार्फत माफी मागितली गेल्यानंतर याचिका दाखल करणाऱ्या व्यक्तीने खटला मागे घेतला अाहे. साईबाबा देव नाहीत, यामुळे त्यांची पूजाअर्चा केली जाऊ नये, असे स्वरूपानंद यांनी वारंवार वक्तव्य केले होते. यानंतर त्यांच्या अनुयायांनी साई मंदिरांना विरोध करण्यास सुरुवात केली होती.