आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हरदा : ५ दिवसांनी एक रेल्वे ट्रॅक पूर्ववत होणार, दुसरा ट्रॅक सुरू होण्यासाठी १५ दिवस लागणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हरदा (मप्र)- हरदा येथे मंगळवारी झालेल्या रेल्वे दुर्घटनेनंतर इटारसी ते मुंबई रेल्वे ट्रॅक (अप ट्रॅक) पूर्ववत होण्यासाठी किमान चार दिवस लागणार आहेत. सर्वाधिक नुकसानग्रस्त डाऊन ट्रॅकवर १५ दिवसांनी रेल्वे धावू शकेल.

गुरुवारी मृतांचा आकडा ३० वर पोहोचला. मुसळधार पावसामुळे रेल्वेरुळ खचून मंगळवारी रात्री हरदाजवळ कामायनी एक्स्प्रेसचे ११ व जनता एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले होते. गुरुवारी रेल्वेने २५० मीटर परिघात खचलेल्या रुळाची डागडुजी सुरू केली. क्रेनद्वारे जनता एक्स्प्रेसचे डबे हटवण्यात आले.

२४ तास दुरुस्ती काम
गेल्या ४८ तासांपासून हरदामार्गे एकही रेल्वे गेलेली नाही. २४ तास रुळाची दुरुस्ती सुरू आहे. सर्वात आधी मुंबईकडे जाणारा रेल्वेमार्ग पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या कामी सुमारे ८०० गँगमॅन झटत आहेत.