आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामूहिक अत्याचाराच्या प्रयत्नात अयशस्वी; मुलीस जिवंत जाळले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अशोकनगर - मध्ये प्रदेशच्या अशोकनगर जिल्ह्यातील खेजरताल गावात एका किशोरवयीन मुलीवर सामूहिक अत्याचाराचा प्रयत्न अयशस्वी राहिल्याने आरोपींनी तिला जिवंत जाळल्याची घटना समोर आली.  
 
शाढौरा येथील पोलिसांच्या म्हणण्यानुसार पीडित मुलगी शनिवारी सायंकाळी शौचासाठी जात होती. त्याच वेळी गावात राहणाऱ्या आरोपीने आपल्या साथीदारांसह तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, परंतु तिने सर्वांना चकवा देऊन घर गाठले. त्यानंतर आरोपी तिच्या घरी पोहोचले. तिच्यावर केरोसीन टाकून तिला पेटवून दिले. 
 
घटनेच्या वेळी ती घरात एकटीच होती. या प्रकरणात पीडितेच्या नातेवाइकांनी गावातील रवींद्र, चंद्रभान, हरवीरसह एका अन्य आरोपीवर अत्याचाराचा प्रयत्न व जिवंत जाळण्याचा आरोप लावला आहे. तिला जिवंत जाळल्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळाहून फरार झाले. 
बातम्या आणखी आहेत...