आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

9 वर्षाय हिमांशू म्हणाला- गुप्तधनाच्या हव्यासापोटी आई माझा बळी देणार होती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपी आई सपना आणि इन्सेटमध्ये मुलगा हिमांशु

इंदूर- मध्य प्रदेशातील इंदूर जिल्हा न्यायालयात एका नऊ वर्षीय मुलाने जन्मदात्री आईविरुद्धच याचिका दाखल केली आहे. हिमांशू असे याचिकाकर्ता मुलाचे नाव आहे. गुप्तधनाच्या हव्यासापोटी आईने त्याचा बळी देण्याचा प्रयत्न केल्याचे हिमांशूने कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे. हिमांशूच्या याचिकेवर बुधवारी कोर्टात सुनावणी झाली. कोर्टाने हिमांशूच्या आईविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांना आदेश दिले आहेत. याप्रकरणी पुढील सुनावणी 14 सप्टेंबरला होणार आहे.

काय आहे प्रकरण...
याचिकाकर्ता हिमांशूने सांगितले की, 'मागिल वर्षी मे महिन्यात तो आईसोबत आजोळी गेला होता. आजोळी गुप्तधन असल्याचे एका मांत्रिकाने सांगितले होते. मात्र, गुप्तधन बाहेर काढण्यासाठी अल्पवयीन मुलाचा बळी द्यावा लागेल, असेही मांत्रिकाने सांगितले होते. हे ऐकताच आईने (सपना) मागील पुढील कोणताही विचार न करता मला पुढे केले. ती मांत्रिकाच्या बोलण्यावर प्रभावित झाली होती.

काही दिवसांनी आम्ही सगळे इंदूरला अालो. आईने सगळ्यांना गुप्तधनाविषयी माहिती दिली. मात्र, त्यावर आजीने आक्षेप घेऊन घेतला होता. परंतु, त्याच्याकडे दुर्लक्ष करून आई मला पुन्हा आजोळी घेऊन गेली. त्या दिवशी अमावस्या होती. आजोबांकडे मांत्रिक आला होता. पूजा करून त्याने रक्त काढण्यासाठी माझ्या हाताला सुया टोचल्या. मी वेदनेने ओरडत होतो. त्यावर मांत्रिकाने मला मारले. मी त्यात बेेशुद्ध झालो. माझ्या हातातून रक्त न निघाल्याने मांत्रिकाने मला आजी आणि वडिलांकडे सोडून पळून गेला होता.'

आई घरातच करत होती अघोरी पूजा...
हिमांशूने सांग‍ितले की, 'आई घरातच अघोरी पूजा करायची. पूजेला मला बसवायची. तब्बल दोन-तीन तास ही पूजा चालायची. आगीत लिंबू, दारु, अंडी टाकायची. धूरामुळे मला श्वास घेणेही कठीण होत असे. डोळ्यांची आग व्हायची.'

एका महिन्यापूर्वी दाखल केली होती याचिका..
हिमांशु बैरवा याने आजी कमलाबाईच्या माध्यमातून आरोपी सपना विरुद्ध एक वर्षांपूर्वी याचिका दाखल केली होती. कोर्टाने हे प्रकरण महिला व बाल विकास विभागाकडे सोपवले होते. अधिकार्‍याचा अहवाल मिळाल्यानंतर कोर्टाने याचिकेवर कार्यवाही सुरु केली आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, संबंधित फोटो...
-