आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Ticket Give Youth, 52 Numbers Candidate In Congress BJP

तरुणांना तिकीट देण्यात कंजुषी,52 तरुण उमेदवारांमध्ये काँग्रेस-भाजपचा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - सर्वच राजकीय पक्ष तरुणांना प्रतिनिधित्व देण्याच्या गप्पा करीत असतात, पण तिकीट वाटपाची वेळ आल्यानंतर प्रत्यक्षात कंजुषी करतात हे दिसून आले आहे.यंदा मध्य प्रदेशात 25 वर्षे वयाचे 52 उमेदवार आहेत, पण त्यामध्ये भाजप आणि काँग्रेसचा एकही उमेदवार नाही. इतर राजकीय पक्षांनी याच वयाचे 23 उमेदवार रिंगणात उतरवले आहेत तर 28 उमेदवार अपक्ष म्हणून आपले उतरले आहेत. काँग्रेसच्या तुलनेत भाजपचे वयस्कर उमेदवार अधिक आहेत.
एकूण 2587 उमेदवारांमध्ये सर्वाधिक संख्या 41 ते 50 वयोगटातील उमेदवारांची आहे.सर्वात वयस्कर 84 वर्षांचे रामलाल ऊर्फ महात्मा त्यागी असून ते अखिल भारतीय गोंडवाना पक्षाच्या तिकीटावर भोपाळ मध्य ची जागा लढवत आहे.भाजपकडून सर्वात वयस्कर उमेदवार बाबूलाल गौर 83 वर्षांचे आहेत. ते गोविंदपुरा मतदारसंघातून दहाव्या वेळेस निवडणूक लढवत आहेत.
काँग्रेसचे 83 वर्षीय हजारीलाल रघुवंशी सिवानी मलावा भागातून मैदानात उतरले आहेत. 70 पेक्षा अधिक वयाचे 8 उमेदवार भाजपचे असून काँग्रेसचे तीन आहेत. इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवार मिळून एकूण 30 उमेदवार 70 पेक्षा अधिक वयाचे आहेत. भाजप व काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांनी तिकीट वाटपात 50 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले आहे. या पक्षांनी निम्म्यापेक्षा अधिक तिकिटे 50 पेक्षा अधिक वय असलेल्या उमेदवारांना दिली आहेत. सगळ्यात तरुण म्हणजे 29 वय असलेले केवळ चारच कार्यकर्ते या पक्षांकडून तिकीट मिळवण्यात यशस्वी झाले आहेत. या वयोगटात भाजपने एक व काँग्रेसने तीन जणांना तिकीट दिले आहे. 40 ते 49 या वयोगटातील कार्यकर्त्यांना दोन्ही पक्षांनी समान म्हणजे प्रत्येकी 73 उमेदवार दिले आहेत हे विशेष.