आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Transfere Of IAS IPS Within Two Years, Union Personnel Minister Order

आयएएस-आयपीएसची दोन वर्षे बदली करता येणार नाही, केंद्रीय कार्मिक मंत्रालयाचा निर्णय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - आयएएस किंवा आयपीएस अधिकार्‍यांना आता त्यांच्या नियुक्तीनंतर किमान दोन वर्षे त्या पदावरून हलवता येणार नाही. केंद्रीय कार्मिक मंत्रालयाने अखिल भारतीय सेवेतील अधिकार्‍यांच्या नियुक्त्यांसंदर्भात नवी नियमावली लागू केली आहे. या नियमानुसार एखाद्या अधिकार्‍याला संबंधित पदावरून हटवायचे असेल तर राज्य स्तरावरील लोकसेवा मंडळ निर्णय घेईल. यासाठी अशा मंडळाची तत्काळ स्थापना करण्याचे निर्देशही राज्यांना देण्यात आले आहेत. वन विभागातील अधिकारीही या नियमाच्या कक्षेत असतील.

उत्तर प्रदेशात अखिलेश यादव सरकारने आयएएस अधिकारी दुर्गाशक्ती यांना निलंबित केले होते. या निर्णयावरून प्रचंड वाद झाला. केंद्रीय सेवेतील अधिकार्‍यांनी यावरून आंदोलनही केले होते. त्यानंतर केंद्र सरकारने अशा अधिकार्‍यांच्या सेवा नियमावलीत दुरुस्ती करण्याची सूचना दिल्या होत्या. राजकीय दबावाखातर अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या जाऊ नयेत, असे कार्मिक मंत्रालयास सूचित करण्यात आले होते. त्यानुसार कार्मिक मंत्रालयाने नवी नियमावली तयार केली.