भारताचे कैलाश सत्यार्थी आणि पाकिस्तानची मलाला युसूफझाई यांना बुधवारी शांततेसाठी नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांना हा पुरस्कार संयुक्त रूपाने देण्यात आला. शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाल्यांनतर सत्यार्थी मायदेशी परतले आहेत. त्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या विदिशीमध्ये मोठ्या थाटात त्यांचे स्वागत करण्यात आले.
सत्यार्थीच्या स्वागतासाठी विदिशी गावातील घरा-घरांमध्ये लगबग चालू होती. त्यांच्या स्वागताची भव्य तयारी करण्यात अली होती. ढोल-ताशा आणि शंकाच्या गजरामध्ये सत्यार्थींचे गावात स्वागत करण्यात आले. सत्यार्थींच्या समर्थकांनी शहरभर मीठाई वाटून आनंद साजरा केला.
नोबेल पुरस्कार मुलांना आर्पण-
प्रत्येक मुलांना त्यांचा अधिकार मिळायला हवा यासाठी मी प्रयत्न केला. यामुळेच मला या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. हा पुरस्कार मी मुलांना आणि विदिशीमधील सर्वर नागरिकांना अपर्ण करतो, अशा भावना सत्यार्थीने यावेळी व्यक्त केल्या.
पुढील स्लाईडवर पाहा सत्यार्थींच्या स्वागताची फोटो...