आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे प्रत्येक घरात बनतात \'कंट्री मेड पिस्तूल\'; आजपर्यंत फिरकू शकले नाहीत पोलिस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वाल्हेर- मध्य प्रदेशातील चंबळ खोरे अवैध शस्त्रास्त्र पुरवठा करण्याचे केंद्र बनले आहे. खोर्‍यातील प्रत्येक घरात कंट्री मेड पिस्तूल अर्थात देशी कट्टा बनवण्याचे काम खुलेआम चालते. देशी कट्टाच नव्हे तर 9 एमएमच्या पिस्तूल, 12 बोरची बंदूक येथे सहज उपलब्ध होते. प्रत्येक घरात हा उद्योग सुरु आहे, पण आजपर्यंत या भागात पोलिस साधे फिरकूही शकले नाही, इतकी या लोकांची दहशत आहे.

हेवी जीआय पाईप लेथ मशीनवर घासून, नंतर भट्टीत तापवून त्याला हवा तसा आकार दिला जातो. काही तासांत पिस्तूल तयार करून दिली जाते, ती ही कमी किंमतीत. एक हजार रुपये किमतीत देशी कट्टा मिळतो.

असे बनवले जातात पिस्तूल...
-मागील तीन महिन्यांत शस्त्र पुरवठा करणार्‍या टोळीशी संबंधीत काही लोकांनी भिंड पोलिसांनी अटक केली.
- हे सर्व लोक चंबळमधील खोर्‍यात शस्त्रास्त्रांचा पुरवठा करतात.
- भिंडमधील माडहन या गावात अनेक दशकांपासून देशी शस्त्रास्त्र बनवण्याचे काम चालते. येथे गुन्हेगारांचे वर्चस्व जास्त आहे. पोलिसांनी देखील आजपर्यंत या गावात छापा टाकण्याची हिंमत दाखवली नाही.
- येथील लोक शस्त्रास्त्र बनवण्यात कुशल आहेत. देशी कट्टे, 9 एमएमची पिस्टूल ते काही तासांत बनवून देतात.

लाखों रुपयांचे शस्त्रास्त्र मातीमोल किमतीत...
-एक पिस्टूल किंवा बंदुकीची किंमत 50 हजार ते दोन लाख रुपये आहे. तर देशी कट्टा एक हजार रुपयांत सहज मिळते.
-9 इंचाचा बॅरल असलेला देशी कट्टा 1500 ते 4000 रुपये किमतीत सहज उपलब्ध होते. रायफल पेक्षा लहान 18 इंचाचा बॅरल असलेले शस्त्र अर्थात 'पौनी तमंचा' 50000 रुपयांत उपलब्ध करून दिले जाते.

विदेशी पिस्तूलची कापी करण्यात पारंगत
- येथील कारागिर इतके कुशल झाले आहेत की, विदेशी पिस्तूलची ते हुबेहुब कॉपी करतात. 5 ते 10 हजार रुपयांत ते बनवून देतात.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, 'कंट्री मेड पिस्तूल' बनवणार्‍या कारगिरांचे फोटोज....
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...