आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘डोरेमॉन’वरून टीव्ही वाहिन्यांना नोटीस, कायदेशीर कारवाईचा इशारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - डोरेमॉन, शिन चेनसारख्या कार्टून मालिकांध्ये वापरले जाणारे कंटेंट, संवाद मुलांना बिघडवत आहेत. या मालिका मुलांसाठी आक्षेपार्ह आहेत, असा आक्षेप घेत मध्य प्रदेशातील व्हिसेल ब्लोअर आशीष चतुर्वेदी यांनी त्यांच्याविरोधात कायदेशीर नोटीस जारी केली आहे. या मालिकांचे प्रसारण करणाऱ्या हंगामा टीव्ही, डिस्नी इंडियासह मॅकडोनाल्ड मुख्यालय यांनाही त्यांनी नोटीस बजावली आहे.

मध्य प्रदेशातील व्यापमं हा परीक्षा भरती घोटाळा उघडकीस आणणारे माहिती अधिकार कार्यकर्ते म्हणून आशीष चतुर्वेदी यांची ओळख आहे. त्यांनी त्यांच्या नोटिशीमध्ये म्हटले आहे की, या मालिकांचे मुख्य पात्रांचे असंबद्ध आणि भारतीय संस्कृतीला धरून नसणारे संवाद कानावर पडल्याने मुले मानसिकदृष्ट्या आजारी पडत आहेत. त्यांची वागण्ूक बदलत आहे. ते आपले आई - वडील, नातेवाईक, शिक्षक व मित्रांसोबत डोरेमॉन, शिन चेन या पात्रांच्या शैलीत बोलत आहेत. चतुर्वेदी यांनी या मालिका दाखवणाऱ्या वाहिन्यांना १५ दिवसांत त्यांनी या मालिकांमधील आक्षेपार्ह पात्रे हटवावीत, अन्यथा त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

या कायदेशीर नोटिशीमध्ये त्यांनी केंद्र सरकारचे माहिती व प्रसारण मंत्रालय, महि व बाल विकास मंत्रालय, मध्य प्रदेश सरकारचा महिला व बाल विकास विभाग यांनाही प्रतिवादी बनवले आहे. या नोटिशीतील आक्षेपांची दखल न घेतली गेल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा त्यात देण्यात आला आहे.

नोबितावरही घेतला आक्षेप
नोटिशीत डोरेमॉन मालिकेतील पात्र नोबिताच्या वर्तनावर आक्षेप घेण्यात आला आहे. नोबिता आपल्या आई - वडिलांचे म्हणणे ऐकत नाही. तो वर्गात इतर मुलांशी अभद्र भाषेत बोलतो. शिन चेनचे मुख्य पात्र आईच्या झोपेत अडथळे आणतो. मुले डोरेमॉनचे स्टिकर, बॅग खरेदी करण्याचा हट्ट धरतात, असेही नोटिशीत म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...