आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता आयुर्वेदिक औषधींची चाचणी, लवकरच अधिसूचना जारी करणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - नव्या आयुर्वेदिक औषधींना आता क्लिनिकल चाचणीनंतरच बाजारात आणण्याची आयुष विभागाकडून परवानगी दिली जाणार आहे. या प्रकरणी केंद्र सरकार लवकरच एक अधिसूचना जारी करणार आहे.

आयुर्वेदिक औषधींच्या नावाखाली निकृष्ट सामग्रीच्या विक्रीला अटकाव व गुणवत्तेचा दर्जा वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला जात आहे. अनेक औषधींचा ड्रग्ज अॅक्टमध्ये समावेश असून प्राचीन ग्रंथांमध्येही त्यांचा उल्लेख आढळतो. मात्र, अनेक पेटेंटेड आणि प्रोपायटरी ड्रग्ज कोणत्याही सुरक्षा चाचणीविना बाजारात दाखल होत आहेत. या औषधींसाठी कंपन्यांना फक्त राज्य सरकारची मंजुरी घ्यावी लागते. त्यासाठी क्लिनिकल ट्रायलची गरज नसते.