आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Now Do Yours Railway Reservation Through Interless Mobile

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंटरनेट नसलेल्या मोबाइलवरूनही करा रेल्वेचे तिकीट बुकिंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - इंटरनेट सेवा नसलेल्या मोबाइलवरूनही तुम्ही आता तिकीट बुकिंग करू शकाल. त्यासाठी ग्राहकाकडे स्मार्टफोन असावा, असेही काही नाही. तर साध्या मोबाइलवरूनही त्यांना या सेवेचा लाभ घेता येईल. मात्र, त्यासाठी ग्राहकाकडे एअरटेलचे सिम असणे आवश्यक असून तिकिटाचे पैसे ‘एअरटेल मनी’च्या माध्यमातून भरता येतील.

मोबाइलवर रेल्वे तिकीट बुक करण्यासोबतच आता प्रवाशांना आणखी एक नवी सुविधा उपलब्ध होईल. भारतीय एअरटेल लिमिटेडचे आंध्र प्रदेश विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश मेनन यांनी सांगितले की, ही सेवा मोबाइल उपकरणावरच कार्य करेल. त्यासाठी कुठल्याही प्रकारचा डाटा किंवा एसएमएस प्रभारची गरज नसेल. यूएसएसडी (अनस्कचर्ड सप्लिमेंट सर्व्हिस डाटा) संस्थेच्या माध्यमातून तिकीट बुकिंगची प्रक्रिया पूर्ण होईल. रेल्वेच्या बुकिंग सेवेवरील ताण करण्याच्या या सेवेमागचा प्रयत्न आहे.