आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देवीच्या यात्रेत युवतींचा अश्लील डान्स; अंबटशैकिनांनी उडवले पैसे, पेटला वाद!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंदसौर (इंदूर)- मध्यप्रदेशमधील इंदूरजवळील मंदसोरमध्ये फौसरी मातेच्या यात्रेत देवीचे जागरण झाल्यानंतर झालेल्या अश्लील डान्सला जोरदार विरोध झाला. त्यामुळे डान्स कार्यक्रम मध्येच थांबवावा लागला. बुधवारी रात्री मंचावर ‘चिपका ले सैंया फेविकोल से’ आणि ‘बंद कमरे में प्यार करेंगे’ यासारख्या गाण्यांवर आर्केस्ट्रासोबत आलेल्या मुलींनी अश्लील डान्स केला. ज्यावर अंबाटशैकिनांनी पैसा उडवला. हा धांगडधिगाणा सुरु होताच गावातील महिला व मुले कार्यक्रमस्थळी दाखल झाले. महिला व ग्रामस्थांनी अश्लील डान्सबाबत नाराजी व्यक्त केली. गावच्या सरपंचानी या कार्यक्रमाचे समर्थन करताना गर्दीसाठी असे मनोरंजन कार्यक्रम आवश्यक असतात असे सांगून वेळ मारून नेली.
चैत्र नवरात्रीनिमित्त दरवर्षी या गावात या 10 दिवसीय यात्रेचे आयोजन केले जाते. बुधवारी रात्री 10 वाजता भजन संध्याचे आयोजन केले होते. त्यानंतर आर्केस्ट्राच्या नावाखाली ‘निम्बोंडा नाइट धमाल’ च्या युवतींनी अश्लील डान्स केला.
‘गोरे-गोरे से छोरे’, ‘बाबूजी जरा धीरे चलो’, ‘चिपका ले सैंया फेविकोल से’ आणि ‘बंद कमरे में प्यार करेंगे’ गाण्यांवर अश्लील व अर्धनग्न डान्स केला. मंचाजवळ केलेले अनेक युवक अश्लील डान्स करीत असलेल्या युवतींजवळ केले व पैसे उडवू लागले. यातील अनेकांनी दारू प्याली होती. रात्र जशी जशी होऊ लागली तसा तसा कार्यक्रम रंगात येऊ लागला. मात्र, महिलांनी व ग्रामस्थांनी यावर आक्षेप घेतला.

आयोजन पंचायतीने केले असल्यामुळे सरपंचाला याचे समर्थन करावे लागले. यामुळे मोठा वाद रंगला. अखेर पोलिसांत तक्रार करण्यात आली. मात्र, यापुढे गावात असे अश्लील कार्यक्रम ठेवू नयेत असा समज देण्यात आला. सरपंचानीही ते मान्य केले. आर्केस्ट्रा वाल्यांनी पण ग्रामीण भागात आधुनिक व बोल्ड डान्स करू नये अशा सूचना आर्केस्ट्रा प्रमुखाला दिला व हे प्रकरण कसे तरी थांबवले.
पुढे छायाचित्रांच्या माध्यमातून पाहा, कसा केला गेला अश्लील डान्स, PHOTOS...