आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Officer Of Bmc Catch In Camera Watching Porn Video

मनपा सर्वसाधारण सभेत पोर्न व्हिडिओ पाहाताना कॅमेरात कैद झाला अधिकारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पोर्न बघताना अधिकारी अनिल शर्मा. - Divya Marathi
पोर्न बघताना अधिकारी अनिल शर्मा.
भोपाळ - लोकप्रतिनिधी सभागृहामध्ये सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्याऐवजी पोर्न क्लिप पाहाताना पकडल्या जाण्याच्या घटना घडलेल्या आहेत. आता एक अधिकारी सभागृहाचे कामकाज सुरु असताना अश्लिल चित्रफित पाहाताना कॅमेरात कैद झाला आहे. ही घटना भोपाळ महापालिकेत घडली आहे. महापालिकेच्या 18- 19 जानेवारीच्या सभेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आयुक्तांनी अधिकाऱ्याला निलंबित केले आहे.

चुकीने ओपन झाला व्हिडिओ... अधिकाऱ्याची सारवासारव
झोन क्रमांक 10 चे अधिकारी अनिल शर्मा त्यांच्या मोबाइलवर पोर्न व्हिडिओ पाहाताना कॅमेरात कैद झाले होते.
- सभेचे व्हिडिओ चित्रिकरण करण्यात आले होते. त्यात शर्मा एकाग्र होऊन व्हिडिओ पाहाताना दिसले.
- या प्रकरणावर शर्मा यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, काही दिवसांपूर्वीच मी फोन बदलला होता. त्याचे फंक्शन अजून मला माहित नाहीत.
- शर्मा म्हणाले, मोबाइलवर एक मॅसेज आला होता, तो ओपन करत असताना चुकीने पोर्न व्हिडिओ सुरु झाला.
तत्काळ चौकशी आणि निलंबन
पालिका वर्तुळात हे वृत्त वाऱ्यासारखे पसरले आणि शर्मा यांच्यावर नामुष्किची वेळ आली. महापौर अलोख शर्मा यांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ आयुक्तांना या प्रकरणी चौकशी समिती नेमण्यास सांगितली. चौकशीत शर्मा दोषी असल्याचे समोर आले आणि त्यांना त्याच वेळी निलंबित करण्यात आले.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, आणखी फोटो....