आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील वाढती असहिष्णुता हा शापच : उद्योगपती रतन टाटा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वाल्हेर- असहिष्णुतेवरचिंता व्यक्त करताना प्रमुख उद्योगपती रतन टाटा यांनी म्हटले, देशात सध्या वाढत चाललेली असहिष्णुता ही शाप आहे. असहिष्णुता वाढत चालल्याचे सर्वांनाच कळते आहे, परंतु इतर देशवासीयांप्रमाणे हा देश असहिष्णुतामुक्त व्हावा, असे ते म्हणाले. तत्पूर्वी या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी टाटा यांना करिअरशी संबंधित काही प्रश्न विचारले.

टाटा यांनी स्पष्टपणे सल्ला दिला : मुलींचे गुण पाहून प्रेम करा. त्याचप्रमाणे स्टार्टअपमध्ये दडलेल्या संधी आणि त्यास चालना देणाऱ्या व्यक्तीचे गांभीर्य ओळखून मगच गुंतवणूक करा. कोणत्याही स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करण्याआधी त्यांचा बिझनेस प्लॅन आणि तो सुरू करण्यामागची समर्पणाची भावना मी जरूर पाहतो.

बुद्धिमत्तेचे आकलन नाही
>एका विद्यार्थ्याने विचारले, पालक सांगतात : जास्त मार्क्स मिळव. तरच टिकून राहशील. यावर टाटाचे उत्तर होते : गुणावरून बुद्धिमत्तेचे आकलन होत नाही.
>टाटा यांनी म्हटले, बिल गेट्स आणि स्टीव्ह जॉब्ज ही अशी मंडळी आहेत, ज्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलेले नाही, पण यशस्वी ठरले.
>भारतातील भ्रष्टाचारासंबंधात टाटा म्हणाले : आमच्या कंपनीने कोणत्याही कामासाठी कधी लाच दिलेली नाही. तथापि, याचा फटका आम्हाला सहन करावा लागला. या मूल्यांच्या बाबतीत कधीही तडजोड नसावी, असे मला वाटते.

दुसरा माधव अवॉर्ड, १९६४ बॅचचे मेट्रोपॉलिस हेल्थ केअर लि.चे चेअरमन डॉ. सुशील शहा यांना देण्यात आला.
>टाटांनी सांगितले, आमच्या कंपनीने लोकांच्या विश्वासास पात्र ठरतील अशीच उत्पादने आणली. हेच आमच्या यशाचे गुपित आहे.
>विद्यार्थ्यांना सल्ला : शिक्षण हे केवळ गुण मिळवण्याचे साधन समजू नका. उलट तुमच्यामध्ये नेतृत्वगुण आणि कौशल्ये विकसित करा. यश तुमच्या हातात असेल.
>रतन टाटा यांनी विद्यार्थ्यांना सांगितले, येणाऱ्या काळात देशात सर्वजण समान असतील. सर्व कामे गुणवत्तेच्या अाधारे पूर्ण होतील. देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य मात्र सर्वांना हवे आहे.
बातम्या आणखी आहेत...