आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मध्य प्रदेश : शंभर कोटींचा कांदा सडल्याने मोठे नुकसान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खंडवा (मध्य प्रदेश) - कांद्याच्या झालेल्या वांध्यामुळे मध्य प्रदेश सरकारला मोठा फटका बसला. शासनाने शेतकऱ्यांकडून ६ रुपये किलो दराने १०० कोटी रुपयांच्या कांद्याची खरेदी केली हाेती. पण गोदामात साठवलेला हा कांदा सडल्याने तो फेकून द्यावा लागला. सरकारने हा कांदा राज्यातील ६२४ गोदामांत साठवून ठेवला होता. या गोदामांचे १० कोटी रुपये इतके भाडे झाले; पण नुकसानीमुळे भाडे चुकवता येणे शक्य झाले नाही. त्याचबरोबर या कांद्यासाठी करण्यात आलेली वाहतूक व मजुरीपोटी २ कोटींचे देणे बाकी आहे.

मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी साठवणुकीचे धोरण आखलेले नसताना सरकारने, ६ जूनपासून कांदा खरेदी सुरू केली. खरेदी करण्यात आलेले कांदे साठवून ठेवण्यासाठी मध्य प्रदेश वेअर हाउसिंग कॉर्पोरेशनने राज्यातील ६२४ गोदामे भाड्याने घेतली. २५ जूनपर्यंत म.प्र. विपणन महासंघाने सुमारे १०० कोटी रुपयांच्या कांद्यांची खरेदी केली. त्यानंतर हा कांदा विक्री करण्यासाठी दाेन वेळा निविदा मागवल्या; पण भाव जास्त सांगण्यात आल्याने कोणी विकत घेण्याची तयारी दर्शवली नाही. यादरम्यान हजारो क्विंटल कांदा सडला. तो फेकून द्यावा लागला. जो उरला तोही १ रुपया दराने विकावा लागला. नि:शुल्क हमी न मिळाल्याने सरकारला बँकेकडून कर्ज मिळाले नाही. त्यामुळे गोदाम भाडे, वाहतूक खर्च आणि मजुरीची देयके बाकी आहेत.
बातम्या आणखी आहेत...