आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गावात दहशत पसरवणारा वाघ अखेर जाळ्यात, हत्‍तींवर बसून वनविभागाने केली कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - शाजापूरच्‍या बोलाई परिसरात कित्‍येक दिवसांपासून दहशत पसरवणारा वाघ अखेर सोमवारी वनविभागाच्‍या जाळ्यात अडकला. या वाघाला पकडण्‍यासाठी वनविभागाचे अधिकारी दोन हत्‍तींवरून जंगलात निघाले होते. अधिका-यांच्‍या टीमला पाहून वाघोबा लपून बसले. ट्रँक्विलायझर गनने (जनावरांना बेशुद्ध करणारी बंदूक) शॉट मारल्‍यानंतर वाघ धावत
सुटला. पुढे बेशुद्ध अवस्‍थेत अधिका-यांनी त्‍यांला पिंज-यात बंद केले.
- बोलाई परिसरातील वाघ पकडण्‍यासाठी वनविभागाच्‍या टीमने रविवारी रात्री जाळे लावले होते. पण वाघ जाळ्यात अडकला नाही.
- दुस-या प्लॅननुसार, रेस्‍क्यू ऑपरेशनसाठी 6 टीम तयार करण्‍यात आल्‍या.
- दोन टीम पहाटे 4 वाजता दोन हत्‍तींवर बसून जंगलात शिरल्‍या.
- ऑपरेशन सुरू असताना वाघ गावात शिरू नये यासाठी चार टीम बाहेर तैनात होत्‍या.
- जंगलात जाण्‍यापूर्वी सर्व टीमने आधी सराव केला होता.
- सकाळी सहा वाजता एपीसीसीएफ दुबे यांना झाडांमध्‍ये बसलेला वाघ दिसला.
- टीमला पाहून वाघ लपून बसला होता.
- हत्‍ती वाघाच्‍या दिशेने नेला व 10 मीटर अंतरावरून एपीसीसीएफ दुबे यांनी ट्रँक्विलायझर गनने वाघाचा नेम धरला.
- सुमारे 30 मिनीटनंतर वाघ बेशुद्ध झालेला दिसला.
- वाघाला तेथून खास एका वाहनात शाजापूर येथे पाठवण्‍यात आले.
वाघाने केली दोन गाईंची शिकार
मागील काही दिवसांपासून वनविभाग या वाघाला पकडण्‍यासाठी प्रयत्‍न करत आहे. वाघाने दोन गाईंची शिकार केली आहे. जंगलात वाघ शिरल्‍याने बोलाई गावातील शेतक-यांमध्‍ये प्रचंड दहशतीचे वातावरण होते. लोक शस्‍त्र घेऊन घराबाहेर पडत होते.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, वनविभागाच्‍या कारवाईचे फोटो...