आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे होते भारतातील वादग्रस्त आध्यात्मिक गुरु, यांच्याकडे होत्या 90 रोल्स रॉइस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - 20 व्या शतकातील आध्यात्मिक गुरुंमध्ये आचार्य रजनीश ओशो यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. यांचा समावेश त्या लोकांमध्ये होतो जे धर्मांचे खंडन करत स्वतःचा वेगळा पंथ निर्माण करतात. 'संभोग से समाधी की ओर' सारखी पुस्तके, वेगळ्याच पद्धतीची आध्यात्मिक शिकवण आणि 90 लक्झरी रोल्स रॉइस कारमुळे ते चर्चेत होते. ओशोंची गणना मोठ्या दार्शनिकांमध्ये केली जाते. मात्र त्यासोबतच त्यांच्या नावाभावती अनेक वाद-विवाद जोडले गेले आहेत. 11 डिसेंबर रोजी त्यांची जयंती आहे. यानिमीत्ताने divyamarathi.com त्यांच्यासंबंधीची महत्त्वाची माहिती देत आहे.

ओशोंची विचार सरणी ही कोणताही आडपडदा नसलेली अर्थात स्पष्टतेची होती. ते म्हणत होते की मी जे सांगतो ते श्रीमंत आणि बुद्धीमान लोकांनाच कळू शकते. त्यांच्याकडे 90 लक्झरी रोल्स रॉइस कारचा ताफा होता. 1971 पासून त्यांनी स्वतःला भगवान रजनीश संबोधणे सुरु केले. 22 मे 1980 रोजी त्यांच्या पुण्यातील आश्रमात विलास तुपे नावाच्या व्यक्तीने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. मात्र याची माहिती आधिच पोलिसांना लागली असल्यामुळे ओशोंच्या दिशेने चाकू फेकणाऱ्या तुपेला त्यांनी तत्काळ अटक केली. त्यानतंरही ओशोंचे व्याख्यान सुरु होते. 10 एप्रिल 1981 पासून त्यांनी सार्वजनिक मौन धारण केले होते. हे मौन साडेतीन वर्षे चालले होते. मोरारजी देसाईंच्या जनता पक्ष सरकारने ओशो आश्रमावर अनेक निर्बंध लादले होते. विदेशातून येणाऱ्या लोकांच्या प्रवेशपत्रावर पुणे आश्रम हे गंतव्य ठिकाण लिहिले असेल तर त्यांना सरकारने प्रवेश नाकारला होता.
पुढील स्लाइडमध्ये,
कारबद्दल काय म्हणत ओशो रजनीश
तत्वज्ञानातून केले होते एमए
अमेरिकेत झाली होती अटक
बातम्या आणखी आहेत...