आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Osho Rajneesh Had Given Diksha To Younger Sister

Death Anniv: ओशोंनी बहिणीलाही दिली होती दिक्षा, बघा दुर्मिळ PHOTOS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- ओशोंच्या चपला आजही निशा भारती यांनी जपून ठेवल्या आहेत.)
जबलपूर- 19 जानेवारी 1990 रोजी महाराष्ट्रातील पुणे येथे आचार्य रजनीश यांची प्राणज्योत मालवली. ओशो उर्फ रजनीश हे मुळचे मध्यप्रदेशातील होते. त्यांचा जन्म मध्यप्रदेशातील रायसेन शहराजवळच्या कुच्वाडा गावात जन्म झाला. त्यांना दहा भावंडे होती. त्यातील आठव्या क्रमांकाची लहान बहिण निशा भारती येथील मनमोहननगर येथे राहते. तिने ओशोंकडून दिक्षा घेतली होती. ओशो तिला भेटायला तिच्या घरी आले होते. यावेळी ओशोंनी घातलेली चप्पल आजही तिच्याजवळ आहे.
निशा सांगतात, की 8 ऑगस्ट 1979 रोजी पुण्यातील एका रुग्णालयात त्यांचे वडील उपचार घेत होते. या दिवशी रक्षाबंधनाचा रण होता. संपूर्ण कुटुंब रुग्णालयात होते. आईने मला सांगितले, की सगळ्या भावांना राखी बांध. पण ओशो यावेळी आश्रमात होते. मी तेथे गेले. पण तेथे खुप कडक सुरक्षा व्यवस्था होती. आत काहीही नेणे शक्य नव्हते. म्हणून एका रुमालात लपवून मी राखी नेली होती.
मी त्यांना सांगितले, की मला राखी बांधायची आहे. हे ऐकल्यावर तेथे उपस्थित असलेल्या गार्डने मला रोखले. त्यावेळी माझ्या डोळ्यांत पाणी उभे राहिले. पण ओशोंनी गार्डला मागे जाण्यास सांगितले. मला राखी बांधू दिली. त्यावेळी मी सांगितले, की मलाही दिक्षा घ्यायची आहे. पण ओशोंचा विरोध होता. अखेर त्यांनी मला दिक्षा दिली. ते फार कमी बोलायचे. शांत स्वभावाचे होते. कायम धान्यात राहायचे.
पुढील स्लाईडवर बघा, ओशो रजनिश यांच्या कुटुंबीयांची दुर्मिळ फोटो...