इंदूर- मध्य प्रदेशातील खरगोन शहरातील संजय नगरातील भुरू अब्दुल या युवा शेतकर्याने अनोखा प्रयोग केला आहे. अब्दुलचे शेत डाबरिया फाल्या भागात असून तो दररोज बैलगाडीने शेतात जातो. शेत घरापासून दोन किलोमीटर अंतरावर आहे. बैलगाडीने शेतात जाण्यासाठी त्याला एक तास लागतो.
आपल्या बैलांची चालण्याची गती वाढवण्यासाठी अब्दुलाने दोन घोडे खरेदी केले. गाडीला बैलासोबत घोडा जुंपल्याने बैलांची चालण्याची गती वाढल्याचे अब्दुलाच्या निर्दशनास आले.
बैल आणि घोडा शारीरिक रचना वेगवेगळी आहे. परंतु, दोघांचा चालण्याची पद्धत सारखी आहे. घोड्याचे फुफ्फुसे बैलाच्या फुफ्फुसांच्या तुलनेत ख़ूप मजबूत आहे. परिणामी घोड्यात खूप ताकद असते. घोडा वेगात धावू शकतो. सामान्य घोडा एका तासांत 30 किलोमीटर धावतो. बैल एका तासांत 15-20 किलोमीटर चालतो. निर्धारित केलेल्या अंतरापर्यंत बैल आणि घोड्याला सोबत चालवले तर बैलाचा चालण्याची गती वाढते. घोड्यासोबत चालवण्याने बैलाच खुराक देखील वाढत असल्याचे पशु चिकित्सा विल्सन डाबर यांनी सांगितले.
पुढील स्लाइडवर पाहा, फोटो....