आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्यप्रदेश: चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस नदीत पडली, ११ जणांचा मृत्यू, २५ बेपत्ता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ/विदीशाः मध्यप्रदेशच्या विदिशामध्ये रविवारी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस पुलावरून नदीत पडल्याने ११ जणांचा मृत्यू झाला. ही बस शमशाबादवरून लटेरीला जात होती. बसमध्ये ४० प्रवासी प्रवास करत होते. २५ प्रवासी अद्याप बेपत्ता आहेत. कसा झाला अपघात...
- मिळालेल्या माहितीनुसार, शमशाबादच्या पुढे सापना नदीच्या पुलावर मोठे खड्डे आहेत.
- बस पुलावरून जात असताना बसचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस पुलावरून खाली नदीत कोसळली.
- घटनास्थळी उपस्थित लोकांनी सांगितले की, दुर्घटनेवेळी बसचा वेग जास्त होता.
- बसमधील काही प्रवाशांनी पोहून आपला जीव वाचवला.
अपघाताच्या तपासाचे दिले आदेश
- अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि डिस्ट्रीक्ट अॅडमिनिस्टेशन घटनास्थळी पोहोचले.
- जेसीबीच्या साह्याने बसला नदी बाहेर काढण्यात आले.
- राज्य मंत्री सूर्यप्रकाश मीणा यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
- पर्यवहन मंत्री भुपेन्द्र सिंह यांनी अपघाताच्या तपासाचे आदेश दिले आहेत.
पुढील स्लाईडवर पाहा, या अपघाताचे फोटो..
बातम्या आणखी आहेत...