आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंत्यसंस्कारासाठी गळाभर पाण्यातून गाठावे लागते स्मशान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दतिया (मध्य प्रदेश) - मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यातील उनाव गावाची कथा. लोकसंख्या १३ हजार; पण येथील धरणावर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यामुळे येथील गावकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. १० फूट उंचीच्या या बंधाऱ्यामुळे धरणाच्या वर असलेल्या कॅचमेंट भागात नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. पोहरा गाव उनावपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर आहे. यामुळे धरणाचे पाणी उनावपर्यंत येते.  पावसाळ्याव्यतिरिक्त या नदीत पाण्याची पातळी चार फूट वाढलेली असते. 
 
मुक्तिधाम, कब्रस्तान तसेच शेतात जाण्यासाठी लोकांना नदीच्या पाण्यातून मार्ग काढावा लागतो. बंधाऱ्यांचे बांधकाम होण्यापूर्वी नदीचे पाणी पावसाळ्यातही एक ते दीड फूट इतके असायचे. त्यामुळे लोकांना सहजपणे नदीच्या पाण्यातून जाता येत होते. धरण बांधून झाल्यानंतर पाण्याची पातळी चार फुटांनी वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ट्यूबच्या मदतीने नदीच्या पाण्यातून पलीकडच्या काठावरील  शेतात जावे लागते, तर अंत्ययात्रेच्या वेळीही खांद्यावर तिरडी घेऊन गळाभर पाण्यातून स्मशानभूमीकडे जावे लागते. खेळाच्या मैदानासाठीही मुलांना गळाभर पाण्यातून ट्यूबच्या साह्यानेच नदीतून जावे लागत आहे.  

५ महिन्यांत ४ लोकांचा बुडून मृत्यू  
उनाव येथे सूर्य मंदिरासमोर पहुज नदी वाहते. रविवारी येथे मोठ्या संख्येने भाविक येतात. नदीच्या खोलीचा अंदाज न आल्याने पाण्यात अंघोळीसाठी जाणाऱ्या भाविकांचा मृत्यू ओढावला आहे. गेल्या ५ महिन्यांत ४ भाविकांचा बुडून मृत्यू झाला. 
बातम्या आणखी आहेत...