आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा सत्र न्यायाधीशाच्या परिवारास मानवी साखळी करून लोकांनी वाचवले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवपुरी- मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यापासून ३० किमी अंतरावरील पवा  नदी  पाहण्यास गेलेल्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश डी. पी. एस. गौर यांच्या पत्नी व दोन मुलांसह ६  जण पाण्याच्या प्रवाहात अडकले होते. ही घटना मंगळवारी सायंकाळी ४ ते ४.३० दरम्यानची आहे.  परंतु तेथे उपस्थित असलेल्या लोकांनी पोहरी व तेंदुआ पोलिस ठाण्यास या दुर्घटनेची माहिती कळवली. 

पोलिसांनी तेथील लोकांच्या मदतीने मानवी साखळी बनवली आणि अडकलेल्या सर्व लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.  या नदीच्या पाण्यात ६ जण  अडकल्याची माहिती मिळाली होती. त्यांची तत्काळ सुटका करण्यात आल्याचे पोहरी पोलिस ठाण्याचे प्रभारी राजेंद्र शर्मा यांनी सांगितले. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश या वेळी त्यांच्यासोबत नव्हते.
बातम्या आणखी आहेत...