भोपाळ (मध्य प्रदेश)- ईद-उल-जुहाला पेटा या संस्थेची महिला कार्यकर्ती बेनजीर सुरैया सोमवारी सकाळी सहकार्ऱ्यांसह ताजूल मशिदीसमोर भाज्या आणि पानांचा बुरखा घालून गेली होती. यावेळी ती शाकाहाराचा प्रचार करीत होती. परंतु, संतप्त झालेल्या जमावाने तिला अमानुष मारहाण केली. ती एक महिला आहे याचा विचारही केला नाही.
ताजूल मशिद परिसरात पशूंचा बळी दिला जातो. यासंदर्भात जनजागरण करण्यासाठी बेनजीर सुरैया आणि पेटाचे काही कार्यकर्ते येथे आले होते. बेनजीर यांनी भाज्या आणि पानांपासून तयार केलेला बुरखा घातला होता. यामुळे परिसरातील नागरिक संतप्त झाले. त्यांनी बेनजीर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना अमानुष मारहाण करण्यास सुरवात केली. याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर घटनास्थळी पोलिस दाखल झाले. त्यांनी बेनजीर यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, तरीही नागरिक तिला मारत होते.
दरम्यान, पेटाने आणि संबंधित कार्यकर्त्यांनी लिखित माफी मागितली नाही तर आंदोलन केले जाईल, असा इशारा येथील कलीम नकवी यांनी दिला आहे. पोलिसांनी बेनजीर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर अशांतता पसरवण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
पुढील स्लाईडवर बघा, ताजूल मशिद परिसरातील नागरिकांनी बेनजीर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना कशी बेदम मारहाण केली... ती महिला असल्याचा जराही विचार केला नाही... तिच्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला...