आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Petrol Pumps Are Putting Chip In Machine Delivering Little Oil

ऐशोअरामात जगण्‍यासाठी याने तयार केले पेट्रोल चोरणारे सॉफ्टवेअर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एमपीमध्‍ये सध्‍या अनेक पेट्रोल पंपावर ग्राहकांना लुटले जात असल्‍याचे उघडकीस आले आहे. काही पंपावर पेट्रोल मशिनच्‍या डिस्‍प्लेवर रिमोट कंट्रोलच्‍या सहाय्याने नियंत्रण मिळवणारी चिप बसवण्‍यात येत आहे. या एका चिपची किंमत एक लाख रूपय आहे. चीप तयार करून विकणा-या तरूणाला गुन्‍हे शाखेच्‍या अधिका-यांनी ताब्‍यात घेऊन या चीप जप्‍त केल्‍या आहेत.
गुन्‍हे शाखेचे अधिकारी शैलेंद्र सिंग चौव्‍हान यांनी सांगितले की, अनुपपुर गावातील 27 वर्षाचा तरूण पिंकू उर्फ प्रजापती या प्रकारच्‍या चिप पेट्रोल पंप मालकाला विकत होता. त्‍याने जवळपासन 24 पेट्रोल पंपावर अशा प्रकाच्‍या चिप विकल्‍या असल्‍याची माहिती शैलेंद्र सिंग यांनी दिली आहे.
कशा पद्धतीने तयार केली चिप-
पीजीडीसीएचे शिक्षण पूर्ण करून प्रमोद एलएंडटी आणि गिलवारको कंपनीत पेट्रोल पंप मशिनच्‍या सर्विसिंग आणि रिपेरींगचे काम करत होता. मात्र ऐशो- अरामात जगण्‍यासाठी कष्‍टाचे काम जास्‍त दिवस करायची वेळ आपल्‍यावर येणार नाही. यासाठी प्रमोदने जॉब सोडला आणि मित्र मुकेशकडे इंदौरमध्‍ये आला. मुकेशने त्‍याला पेट्राल चोरी करण्‍याच्‍या सॉफ्टवेअर तयार करण्‍याची पद्धत सांगितली. प्रमोद आणि मुकेश यांनी अनेक पेट्राल पंपावर अशा प्रकारच्‍या अनेक चिप बसवल्‍या असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे.
कशी वापरली जाते चिप-
ही चीप डीजल- पेट्रोल भरणा-या मशिनमध्‍ये लवण्‍यात येते. यामध्‍ये सॉफ्टवेअर सर्किट इंस्‍टॉल करण्‍यात येते. किती पेट्रोल कमी करायचे याची सेटिंग करण्‍यात येते. यांनतर इंस्‍टॉल केलेले सर्किट डीजल- पेट्रोलच्‍या मशिनमध्‍ये असलेल्‍या डिस्‍प्‍ले युनिटमध्‍ये बसवण्‍यात येते. अशा प्रकारे ग्राहकाची चपिच्‍या साहाय्याने लुट केली जात आहे.
पुढील स्‍लाईडवर जाणून घ्‍या कशा प्रकारीची आहे चीप...