आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या \'बँडीट क्विन\'च्या नावाने भल्याभल्यांचा उडायचा थरकाप, 22 जणांची एका रांगेत केली हत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वाल्हेर - आज बँडिट क्विन फुलनदेवीचा जन्मदिवस आहे. भलेही आज फुलन देवी जिवंत नाही, मात्र आजही फुलन देवीचे नाव घेतल्यानंतर अंगावर रोमांच उभे राहाते. फुलनदेवी काही लोकांसाठी खतरनाक डाकू होती, तर काहींसाठी रॉबिनहूड होती. ग्रामीण भागातील एखादी महिला कशी काय एवढी खतरनाक डाकू झाली, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
1976 ते 1983 पर्यंत चंबळच्या खोऱ्यात फुलनदेवीचे राज्य होते. बेहमई कांडनंतर 12 फेब्रुवारी 1983 रोजी तिने मध्यप्रदेशचे तत्कालिन मुख्यमंत्री अर्जूनसिंह यांच्यासमोर काही अटींसह शरणागती पत्करली होती. त्यांतर फुलनदेवीने राजकारणात प्रवेश केला आणि लोकशाहीचे देशातील सर्वात मोठे मंदिर - संसदेत गेली. 25 जुलै 2001 रोजी दिल्लीतील शासकीय निवासस्थानासमोर फुलनदेवीची हत्या करण्यात आली होती. फुलनदेवीच्या बालपणापासून शत्रूच्या मनात धडकी भरवणारी डाकू होईपर्यंतचा प्रवास काळीज चिरणारा होता. या अनुभव आणि अत्याचारांनी फुलनदेवीला एवढे कठोर बनवले की, त्याचा बदला घेण्यासाठी तिने बहमई येथे एका रांगेत 22 ठाकूर उभे केले आणि त्यांना यमसदनी धाडले.
पुढील स्लाइडमध्ये फुलनदेवीची पूर्ण कथा